मराठा आरक्षण प्रश्नात राज्यपालांनी लक्ष घालावे : रणजितसिंह निंबाळकर - Governor should pay attention to Maratha reservation issue says BJP MP Ranjitsingh Nimbalkar | Politics Marathi News - Sarkarnama

मराठा आरक्षण प्रश्नात राज्यपालांनी लक्ष घालावे : रणजितसिंह निंबाळकर

किरण बोळे
बुधवार, 2 डिसेंबर 2020

मराठा समाजातील अनेक युवकांना शिक्षणापासून व उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण अत्यंत महत्त्वाचे असून याबाबत आपण स्वतः पाठपुरावा करून मराठा आरक्षण मिळण्याबाबत प्रयत्न करावेत, असेही खासदार निंबाळकर यांनी यावेळी
स्पष्ट केले. 

फलटण शहर : सध्या राज्यात मराठा आरक्षणावरून रान पेटले असताना माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन मराठा आरक्षणाबाबत आपण लक्ष घालावे. मराठा समाज बांधवांना आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.

भारतीय जनता पक्षाचे माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची दिल्ली येथे महाराष्ट्र सदन येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. 

यामध्ये राज्यपालांनी मराठा आरक्षणाबाबत लक्ष घालून मराठा समाजातील बांधवांना आरक्षण व सद्य स्थितीत विविध सवलती मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी परखड भूमिका मांडली. मराठा समाजातील युवकांचे अनेक प्रश्न जटिल बनले आहेत. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना, युवकांना नोकरी मिळवताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

मराठा समाजातील अनेक युवकांना शिक्षणापासून व उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण अत्यंत महत्त्वाचे असून याबाबत आपण स्वतः पाठपुरावा करून मराठा आरक्षण मिळण्याबाबत प्रयत्न करावेत, असेही खासदार निंबाळकर यांनी यावेळी
स्पष्ट केले. 

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देताना राज्यातील सद्यस्थितीत असणाऱ्या कोणत्याही समाजाचे आरक्षण काढून न घेता मराठा समाजाला स्वतंत्ररीत्या आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी मराठा समाजातील सर्वच नेते मंडळी करीत आहेत. याउलट इतर समाजातील जी नेतेमंडळी मराठा समाजाला आरक्षण मिळण्याबाबत आग्रही आहेत, त्यांचाही पाठिंबा घेऊन मराठा समाजाला आरक्षण देणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा राज्यपालांपुढे मांडली.

शेतकऱ्यांना बिल माफी द्यावी....

सद्यस्थितीला राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांचे व सर्वसामान्य जनतेचे अतिशय हाल चालविले आहे. आगामी काळामध्ये महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांचे व सर्वसामान्य जनतेची लाईट बिले माफ करून लॉकडाउनमध्ये झालेल्या त्रासाबाबत वीजबिल माफी द्यावी. त्याबाबत आपल्या मार्फत महाविकास आघाडीच्या सरकारला पाठपुरावा करण्यात यावा, असा मुद्दाही त्यांनी मांडला. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख