भाजपच्या काळात वीजबिलांची सर्वाधिक थकबाकी; सरकार चौकशी करणार  - The government will investigate the highest arrears of electricity during the BJP regime | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात उमुख्यमंत्री अजित पवार राजभवनावर दाखल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही थोड्याच वेळात पोचणार

भाजपच्या काळात वीजबिलांची सर्वाधिक थकबाकी; सरकार चौकशी करणार 

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 21 नोव्हेंबर 2020

ठाकरे सरकारची भुमिका राज्याचा विकास करताना निवडणुकीत दिलेली आश्‍वासने व वचने पूर्ण करण्याच्या दृष्टीने वाटचाल करायची आहे. संकटावर मात करत राज्य पुन्हा एकदा देशात पहिल्या क्रमांकावर नेण्यासाठी आमचे सरकार वाटचाल करत आहे. विरोधकांनी कितीही अडचणी आणल्या तरी महाविकास आघाडीचे सरकार डगमगणार नाही. खंबीरपणे वाटचा करेल. 

सातारा : वीज वितरण कंपनी आर्थिक अडचणीतून बाहेर निघाल्यावर ग्राहकांना वीजबिलात सवलती देण्याबाबतचा विचार होणार आहे. पण कालच एक माहिती समोर आली आहे. आजची आणि भाजपच्या काळातील वीज बिलांची थकबाकी यामध्ये मोठी तफावत आहे. वीज बिलांच्या थकबाकीचे प्रमाण भाजपच्या काळात सर्वाधिक आहे. याची चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे. 

जिल्हा शिवसेनेच्या बैठकीनंतर मंत्री देसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी प्रा. नितीन बानुगडे पाटील, सदाशिव सपकाळ, धैर्यशिल कदम, रणजित भोसले, चंद्रकांत जाधव आदी उपस्थित होते. 

मंत्री देसाई म्हणाले, विधान परिषद निवडणुकीसाठी तालुकानिहाय शिवसेनेचे तीन, युवा सेनेचा एक व महिला आघाडीचा एक अशी पाच जणांची समिती केली आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघांची उपजिल्हा प्रमुखांवर जबाबदारी दिली आहे. एकुणच जिल्ह्यावर नियंत्रण ठेवण्याचे नियोजन आम्ही केले आहे. या समितीच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचे काम केले जाणार आहे.

यामध्ये शहरी भागात स्वतंत्र समिती आहेत. शिवसेना पूर्ण ताकतीने महाविकास आघाडीचे उमेदवार निवडुन आणण्यासाठी कामाला लागली आहे. जिल्ह्यात महाविकास आघाडीतील तीनही पक्षांचा योग्य समन्वय आहे. त्यामुळे आम्हाला यश मिळेल व या विजयात शिवसेना आपला वाटा ताकतीने उचलले व अग्रभागी राहिल, असे त्यांनी स्पष्ट केले.

राजू शेट्टी व एकनाथ खडसे यांच्या उमेदवारीवरून विरोधकांकडून वाद उपस्थित केले जात आहेत, यावर श्री. देसाई म्हणाले, सरकारच्या एखाद्या निर्णयावर टीका करणे हे विरोधकांचे कामच आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचे काम करत राहावे, सरकार आपले काम करत राहिल. तुमचे महायुतीचे सरकार असताना काँग्रेस, राष्ट्रवादीने कधी इतका विरोध केलेला नव्हता. यावर ते म्हणाले, याचा विरोधकांनी विचार केला पाहिजे. आपण सत्तेत असताना कोणत्या बाबींना विरोध झाला होता.

ठाकरे सरकारची भुमिका राज्याचा विकास करताना निवडणुकीत दिलेली आश्‍वासने व वचने पूर्ण करण्याच्या दृष्टीने वाटचाल करायची आहे. संकटावर मात करत राज्य पुन्हा एकदा देशात पहिल्या क्रमांकावर नेण्यासाठी आमचे सरकार वाटचाल करत आहे. विरोधकांनी कितीही अडचणी आणल्या तरी महाविकास आघाडीचे सरकार डगमगणार नाही. खंबीरपणे वाटचा करेल. 

वाढीव वीज बिलाचा मुद्दा घेऊन भाजपने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे, खरच वीज वितरणकडून वाढीव वीजबिले गेली आहेत का, या प्रश्नावर श्री. देसाई म्हणाले, वीज वितरण कंपनी सध्या आर्थिक अडचणीत असल्याने वसुलीवर भर दिला आहे. त्यामुळे कंपनी आर्थिक अडचणीतून बाहेर निघाल्यावर ग्राहकाच्या सवलतींचा विचार होणार आहे. पण कालच एक माहिती समोर आली आहे. आजची आणि भाजपच्या काळातील थकबाकी यामध्ये मोठी तफावत आहे. वीज बिलांच्या थकबाकीचे प्रमाण भाजपच्या काळात जास्त आहे. याची चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, असे त्यांनी सांगितले. 

ते त्यांचे वैयक्तिक मत....

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठा आणि महिला असली पाहिजेत, असे वक्तव्य आशिष शेलार यांनी काल केले आहे. याबाबत तुमचे मत काय, असे विचारले असताना शंभूराज देसाई म्हणाले, ते त्यांचे वैयक्तिक मत असेल. पण माझे व्यक्‍तिगत मत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हेच असले पाहिजेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख