आदिवासी भागातील ग्रामीण रूग्णालये सेवाभावी संस्थांकडे हस्तांतरीत करणार : राजेश टोपे - Government hospitals in tribal areas to be handed over to charitable organizations: Rajesh Tope | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पूरग्रस्तांना तातडीची मदत; घरात पाणी शिरलेल्यांना १० हजार, अन्न धान्याचे नुकसान झालेल्यांना ५ हजार रुपय मिळणार. वडेट्टीवार यांची घोषणा
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदार व खासदारांचे एक महिन्याचे वेतन पुरग्रस्तांना देण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत दिली.

आदिवासी भागातील ग्रामीण रूग्णालये सेवाभावी संस्थांकडे हस्तांतरीत करणार : राजेश टोपे

अभिजित खुरासणे
बुधवार, 18 नोव्हेंबर 2020

भाऊबीजेचे औचित्य साधुन आरोग्य मंत्री राजेश टोपे हे सहकुटुंब महाबळेश्वरला विश्रांतीसाठी आले आहेत. या त्यांच्या खाजगी दौ-यात त्यांनी महाबळेश्वर ग्रामीण रूग्णालयास सदिच्छा भेट दिली. अलिकडेच राज्य शासनाने येथील ग्रामीण रूग्णालय व तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र हे रेडक्रॉस सोसायटी संचालित बेलएअरकडे व्यवस्थापनासाठी देण्यात आले आहे. बेलएअर व्यवस्थापनाने या रूग्णालयाच्या इमारतीचे नुतनीकरण करून सर्व सुविधा सुसज्ज केल्या आहेत. 

महाबळेश्वर : व्यवस्थापनात बदल केल्यास त्याचे किती चांगले परिणाम होतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे महाबळेश्वर येथील ग्रामीण रूग्णालय म्हणता येईल. येथील अनुभव पाहता ज्या ठिकाणी खुप प्रयत्न करूनही आरोग्य सेवा पोहोचविणे कठीण जाते. अशा आदिवासी भागातील ग्रामीण रूग्णालय व त्या अंतर्गत येणारी प्राथमिक आरोग्य केंद्र रेडक्रॉस सोसायटी सेवाभावी संस्थेकडे हस्तांतर करण्याचा निर्णय दोन आठवडयात घेण्यात येईल, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महाबळेश्वर येथे दिली.

भाऊबीजेचे औचित्य साधुन आरोग्य मंत्री राजेश टोपे हे सहकुटुंब महाबळेश्वरला विश्रांतीसाठी आले आहेत. या त्यांच्या खाजगी दौ-यात त्यांनी महाबळेश्वर ग्रामीण रूग्णालयास सदिच्छा भेट दिली. अलिकडेच राज्य शासनाने येथील ग्रामीण रूग्णालय व तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र हे रेडक्रॉस सोसायटी संचालित बेलएअरकडे व्यवस्थापनासाठी देण्यात आले आहे. बेलएअर व्यवस्थापनाने या रूग्णालयाच्या इमारतीचे नुतनीकरण करून सर्व सुविधा सुसज्ज केल्या आहेत. 

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी या भेटीत रूग्णालयाची इमारत तेथील सर्व सुविधा यांची पाहणी केली. रूग्णालयाची इमारत तेथील सुविधा व स्वच्छता पाहुन ते प्रभावित झाले. त्यांनी ग्रामीण रूग्णालय हे खाजगी  व्यवस्थापनाकडे देण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाचे समर्थन केले. जिल्हयाच्या मानांकनात महाबळेश्वर तालुक्यातील ग्रामीण रूग्णालय व प्राथमिक आरोग्य केद्र यांचा क्रमांक खाली होता.

परंतु व्यवस्थापनात बदल करण्यात आला. नवीन व्यवस्थापनाने राज्य शासनाच्या माता संगोपन या सारख्या अनेक योजना प्रभावी राबवुन उत्तम कामगिरीच्या जोरावर आता महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयाने जिल्ह्यात वरचा क्रमांक प्राप्त केला आहे, अशी माहिती मंत्री टोपे यांनी पत्रकारांना दिली. 

बेलएअरचे व्यवस्थापक फादर टॉमी यांनी रूग्णालातील अडचणी श्री. टोपे यांच्या पुढे मांडल्या. त्यानुसार त्यांनी आधुनिक सुविधा असलेल्या 102 क्रमांकच्या 500 रूग्णावाहिका राज्य शासन घेणार आहे. पुणे विभागाच्या यादीत महाबळेश्वरचे नाव प्राधान्याने वर घेतले जाईल व सर्वात प्रथम महाबळेश्वरला रूग्णवाहिका पुरविली जाईल. येथील व्यवस्थापन जरी बदलेले असले तरी येथील कर्मचारी यांचे पगार, रूग्णांसाठी लागणारी औषधे, वीजबील व इतर खर्च हा राज्य शासनाकडुन दिला जातो.

 परंतु हा वेळेवर मिळत नाही अशी येथील व्यवस्थापनाची तक्रार आहे. ही रक्कम महिन्याच्या पहिल्या तारखेस कशी मिळेल याची व्यवस्था केली जाईल. ग्रामीण रूग्णालय असुन येथे अतिदक्षता विभाग आहे. परंतु तो अदयाप सुरू केलेला नाही. त्यासाठी मंजुरी देऊन सर्व सुविधा शासनाने पुरवाव्या, अशी मागणी बेलएअरने केली आहे.

जर, आपण सुविधा नाही दिल्या तर तो विभाग सुरू करून चार्जेस आकारण्याची परवानगी दयावी, अशी मागणीही बेलएअरने केली. यासंदर्भात बोलताना राजेश टोपे म्हणाले, अतिदक्षता विभाग सुरू करून चार्जेस आकारण्याची परवानगी देण्यात येईल. ग्रामीण रूग्णालय व राज्य शासन यांच्यात केवळ एका वर्षाचा करार केला जातो.

त्यानंतर पुन्हा एका वर्षासाठी कराराचे नुतनीकरण करण्यात येते. परंतु आता हा करार पाच वर्षांचा असेल पुढील पाच वर्षासाठी हे रूग्णालय रेडक्रॉस सोसायटीकडेच असेही त्यांनी स्पष्ट केले. धनिकांसाठी ही येथे काही बेड राखीव असुन त्यांच्याकडुन चार्जेस घेण्यात येणार आहेत अशी माहितीही राजेश टोपे यांनी दिली.

मकरंद पाटलांचे कौतुक....

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी आमदार मकरंद पाटील यांच्या कामगिरीचे कौतुक केले. मकरंद पाटील हे नशिबवान आहेत. कारण त्यांच्या मतदारसंघात रेडक्रॉस सोसायटी संचालित बेलएअर सारखी सेवाभावी संस्था आहे. या संस्थेच्या कामगिरी उच्च दर्जाची असुन महाबळेश्वर ग्रामिण रूग्णालय हे राज्यासाठी रोल  मॉडेल ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
शिस्त पाळा, गर्दी टाळा.....

बाजारपेठा हॉटेल, रेस्टॉरंट, मंदीरे सुरू झाल्याने लोक आता मोठया संख्येने घराबाहेर पडले आहेत. त्यामुळे महाबळेश्वर व पांचगणी ही दोन्ही पर्यटनस्थळे पर्यटकांच्या गर्दीने बहरली आहेत. परंतु या गर्दीत शिस्त पाळली जात नाही. मला काही होणार नाही असे, आता लोकांनी गृहीत धरले आहे. गर्दीत स्वयंशिस्त आवश्यक आहे

अन्यथा ही गर्दी सर्वांना अडचणीत आणु शकते. म्हणुन मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, दिल्ली व केरळ येथे रूग्ण वाढु लागले आहेत. युके, फ्रान्समध्ये लॉकडाउन लागु करण्यात आला आहे. अमेरिकाही अडचणीत आहे. म्हणुन सध्या आपल्या पुढे अडचणी वाढु नये म्हणुन लोकांनी शिस्त पाळली पाहिजे, असे आवाहनही राजेश टोपे यांनी केले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख