वैचारिक परंपरा असलेल्या अरूण लाड यांना राज्यपातळीवर काम करण्याची संधी द्या - Give Arun Lad, who has an ideological tradition, a chance to work at the state level: Ramraje | Politics Marathi News - Sarkarnama

वैचारिक परंपरा असलेल्या अरूण लाड यांना राज्यपातळीवर काम करण्याची संधी द्या

किरण बोळे
बुधवार, 18 नोव्हेंबर 2020

क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याबरोबरीने पत्री सरकारमध्ये काम करणारे क्रांती अग्रणी जे. डी. बापू लाड यांचे चिरंजीव अरुण लाड यांच्या कुटूंबाची पार्श्वभूमी व वैचारिक परंपरा मोठी आहे. विधान परिषदेत वैचारिकतेने काम करणारा आमदार असायला हवा. यासाठी अरुण लाड यांना निवडून आणण्यासाठी कार्यरत रहाणे आवश्यक आहे,असे रामराजे यांनी सांगितले.

फलटण शहर : पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणूकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांच्या घराला वैचारिक वारसा आहे. क्रांतीअग्रणी जे. डी. बापू लाड यांचे ते चिरंजीव आहेत. वैचारिक परंपरा असलेल्या घरातील अरुण लाड यांना राज्यपातळीवर काम करण्याची संधी मिळाली पाहिजे. यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने कार्यरत रहावे, असे आवाहन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
 
पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणूकीतील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अरुण लाड यांच्या प्रचारार्थ फलटण येथे आयोजित 'पदवीधर संवाद मेळाव्यात' ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, दीपक चव्हाण, संजीवराजे नाईक निंबाळकर, सुभाषराव शिंदे, शिवरुपराजे खर्डेकर, सुनिल माने, तेजस शिंदे, किरण लाड, डि. के. पवार, नगराध्यक्षा निता नेवसे, काँग्रेसचे युवा नेते सचिन सूर्यवंशी-बेडके उपस्थित होते.

क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याबरोबरीने पत्री सरकारमध्ये काम करणारे क्रांती अग्रणी जे. डी. बापू लाड यांचे चिरंजीव अरुण लाड यांच्या कुटूंबाची पार्श्वभूमी व वैचारिक परंपरा मोठी आहे. विधान परिषदेत वैचारिकतेने काम करणारा आमदार असायला हवा. यासाठी अरुण लाड यांना निवडून आणण्यासाठी कार्यरत रहाणे आवश्यक आहे,असे रामराजे यांनी सांगितले.

ते म्हणाले, पुर्वी या निवडणूकीत ठराविक पक्षाचे वर्चस्व होते. परंतु आता ती परिस्थिती राहिली नाही. फलटण शहर व तालुक्यात मिळून एकंदरीत नऊ हजार मतदान आहे. संजीवराजे यांनी मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणी केली आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातही मतदार मोठ्यासंखेने आहेत.
जे मतदार बाहेर आहेत त्यांच्याकडून मतदान करुन घ्यावे लागणार आहे.

या निवडणूकीत लाड यांना मतदान करुन घेण्यासाठी नियोजनपुर्वक यंत्रणा राबवावी लागणार आहे.  त्यासाठी गाफिल राहून चालणार नाही. सदर निवडणूकीचे महत्व माझ्या दृष्टीने वेगळे आहे. संपुर्ण सातारा जिल्हा व तालुक्यावर माझे पुर्ण लक्ष राहणार असून आळशीपणा व बेजबाबदारपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही रामराजे यांनी दिला. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख