शेतकऱ्यांनी आता शहाणं झालं पाहिजे; पृथ्वीराज चव्हाणांची बाजाराला भेट

पृथ्वीराज बाबांच्या अचानक बाजारात येण्याने तेथे एकच गर्दी झाली. तेथे उपस्थित एक शेतकऱ्याने ''या मोदींनी शेतकऱ्यांचं पाक कंबरड मोडलंय बघा..'' अशा शब्दात व्यथा मांडली. त्यानंतर श्री. चव्हाण यांनी मिश्कीलपणे हसत शेतकऱ्यांनी आता शहाणं झालं पाहिजे, असे सांगितले.
Farmers should be wise now; Prithviraj Chavan's visit to the market
Farmers should be wise now; Prithviraj Chavan's visit to the market

कऱ्हाड : कोपर्डे हवेलीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बाजारातील शेतकऱ्यांशी संवाद साधत भाज्याही विकत घेतल्या. यावेळी एका शेतकऱ्याने मोदींनी शेतकऱ्यांचे कंबरडंच मोडलय बघा... अशा शब्दात व्यथा मांडली. त्यावर श्री. चव्हाण यांनी मिश्किलपणे हसत ''शेतकऱ्यांनी आता शहाणं झालं पाहिजे'', असे सांगितले.  

कोपर्डे हवेली येथे एका सांत्वन भेटीसाठी माजी मुख्यमंत्री चव्हाण गेले होते. त्या भेटीनंतर बाहेर पडताना कोपर्डे हवेलीतील बाजाराला त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी भाजीपाला विकण्यासाठी घेऊन आलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधत व त्यांच्याकडून भाज्या विकत घेतल्या.

पृथ्वीराज बाबांच्या अचानक बाजारात येण्याने तेथे एकच गर्दी झाली. तेथे उपस्थित एक शेतकऱ्याने ''या मोदींनी शेतकऱ्यांचं पाक कंबरड मोडलंय बघा..'' अशा शब्दात व्यथा मांडली. त्यानंतर श्री. चव्हाण यांनी मिश्कीलपणे हसत शेतकऱ्यांनी आता शहाणं झालं पाहिजे, असे सांगितले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य निवासराव थोरात, अजित पाटील, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, युवानेते इंद्रजीत चव्हाण आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com