ही 'ईडी' च एक दिवस भाजपला  संपवेल : धनंजय मुंडे - This ED will not last one day without ending the BJP says NCP leader Dhanajay Munde | Politics Marathi News - Sarkarnama

ही 'ईडी' च एक दिवस भाजपला  संपवेल : धनंजय मुंडे

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 15 डिसेंबर 2020

श्री. मुंडे म्हणाले, केंद्राने नुकतेच आणलेले कायदे हे शेतकरी आणि कामगारविरोधी आहेत. ते शेतकऱ्यांना फसवणारेच नाहीत, तर संपवणारे आहेत. त्यामुळे शेतकरी संपला, तर देशही संपणार आहे.

पिंपरी : एखाद्या व्यक्तीपर्यंत जाता येत नसेल, तर त्याच्या सहकाऱ्यांपर्यंत जायचं आणि ईडीचा वापर करायचा, हे अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र, हीच ईडी एक दिवस भाजपला संपवल्याशिवाय राहणार नाही. हे माझं वाक्य लिहून ठेवा, असा ठाम आत्मविश्वास सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आज पिंपरी चिंचवडमध्ये व्यक्त केला.

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठांना श्रवणयंत्र वाटप कार्यक्रमासाठी मुंडे शहरात आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जनतेच्या फायद्याच्या योजना आणणे हीच खरी आमच्या नेतृत्वाला (पवार साहेबांना) वाढदिवसाची भेट असणार आहे, असे ते म्हणाले.

ईडीने कारवाई सुरु केलेले ठाणे येथील शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना सर्वोच्च न्यायालयाने आज दिलासा दिला. त्यावर मुंडेंनी वरील प्रतिक्रिया दिली. ज्यावेळी कनव्हिंस होत नाही, तेंव्हा भाजप कनफ्यूज करतं, असा हल्लाबोल त्यांनी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलन व त्याविषयी भाजपच्या अप्रचारावर केला. श्री. मुंडे म्हणाले, केंद्राने नुकतेच आणलेले कायदे हे शेतकरी आणि कामगारविरोधी आहेत. ते शेतकऱ्यांना फसवणारेच नाहीत, तर संपवणारे आहेत. त्यामुळे शेतकरी संपला, तर देशही संपणार आहे.

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख