दिल्लीत उदयनराजे, श्रीनिवास पाटील भेटले; साताऱ्याचे प्रश्न सामुहिकरित्या संसदेत मांडणार  

सातारा जिल्ह्याचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी सामूहिकरित्या संसदेत मांडण्याबाबत उदयनराजे व श्रीनिवास पाटील यांच्यात चर्चा झाली. त्यामुळे या दोन्ही खासदारांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे जिल्ह्याचे अनेक प्रश्न संसदेत मांडून ते सोडविले जातील.
In Delhi, Udayanraje met Srinivas Patil; The issue of Satara will be raised collectively in Parliament
In Delhi, Udayanraje met Srinivas Patil; The issue of Satara will be raised collectively in Parliament

सातारा : साताऱ्यात शिवेंद्रसिंहराजे भोसले व शशीकांत शिंदेंत वादाची ठिणगी पडलेली असतानाच दिल्लीत मात्र, खासदार उदयनराजे भोसले व राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मात्र, सातारा जिल्ह्यातील प्रश्नांसाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्याचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी सामुहिकरित्या संसदेत प्रयत्न करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे उदयनराजे निवडणूकीतील वैरत्व विसरून श्रीनिवास पाटील यांना महाराष्ट्र सदनात भेटले व दोघांत विविध विषयांवर चर्चा देखील झाली. 
 
विधानसभा निवडणूकीच्या दरम्यान विकास कामांचा मुद्दा करून उदयनराजेंनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे सातारा लोकसभेची पोट निवडणूक झाली. या निवडणूकीत उदयनराजेंच्या विरोधात निवडणूक लढण्यासाठी राष्ट्रवादीतील कोणीही तयार नव्हते. पण खासदार शरद पवार यांनी ऐनवेळी आपल्या मित्रालाच श्रीनिवास पाटील यांनाच निवडणूकीच्या रिंगणात उतरविले.

या निवडणूकीत उदयनराजेंचा पराभव झाला. त्याला साताऱ्यातील शरद पवारांची पावसातील सांगता सभा करणीभूत ठरली. उदयनराजेंचा पराभव भाजपच्या नेत्यांच्या जिव्हारी लागला. त्यामुळे काही महिन्यानंतर उदयनराजेंना राज्यसभेवर घेऊन त्यांच्या पराभवाची भरपाई केली. त्यामुळे साताऱ्याला उदयनराजेंच्या रूपाने तिसरा खासदार मिळाला.

सध्या सातारा जिल्ह्यात भाजपचे माढाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील आणि राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले असे तीन खासदार आहेत. सध्या संसदेचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरू असून यानिमित्ताने तीनही खासदार दिल्लीत आहेत. आज दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे खासदार श्रीनिवास पाटील यांची भेट झाली.

या भेटीत सातारा जिल्ह्याचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी  सामूहिकरित्या संसदेत मांडण्याबाबत उदयनराजे व श्रीनिवास पाटील यांच्यात चर्चा झाली. त्यामुळे या दोन्ही खासदारांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे जिल्ह्याचे अनेक प्रश्न संसदेत मांडून ते सोडविले जातील. वैरत्व विसरून उदयनराजेंनी श्रीनिवास पाटलांची घेतलेली भेट सातारकरांना सुखावणारी आहे. साताऱ्यात शिवेंद्रसिंहराजे व शशीकांत शिदेंत वाद रंगलेला असताना उदयनराजेंनी श्रीनिवास पाटलांची दिल्लीत घेतलेली ही भेट अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com