सांगलीच्या महापौरपदासाठी राष्ट्रवादीही आग्रही; काँग्रेसकडे लक्ष - Congress and NCP Both wants Sangli Mayors post | Politics Marathi News - Sarkarnama

सांगलीच्या महापौरपदासाठी राष्ट्रवादीही आग्रही; काँग्रेसकडे लक्ष

सरकारनामा ब्युरो
रविवार, 14 फेब्रुवारी 2021

सांगली महापालिकेत काँग्रेस व राष्ट्रवादी हे विरोधी बाकावर आहेत . काँग्रेसचे संख्याबळ १९ व राष्ट्रवादीचे १५ आहे . दोन्ही पक्षांची बेरीज ३४ आहे . सत्ताधारी भाजपकडे ४२ व सहयोगी २ नगरसेवक आहेत . फोडाफोडीच्या राजकारणातून चमत्कार घडेल अशा प्रतिक्षेत काँग्रेस व राष्ट्रवादीची मोट बांधून महापौरपदाची निवडणूक लढवण्याची हालचाल सुरू आहे

सांगली : सांगली महापालिकेच्या महापौरपदा विरोधी काँग्रेसने दावा केलेला असताना नगरसेवकांच्या बैठकीत राष्ट्रवादीनेही आक्रमक पवित्रा घेत महापौर पदासाठी आग्रही असल्याचा दावा केला. राष्टवादीचे नेते संजय बजाज यांनी महापौरपदासाठी गटनेते मैनुद्दीन बागवान , माजी गटनेते दिग्विजय सूर्यवंशी , नगरसेवक विष्ण माने हे इच्छुक आहेत. याबाबत जयंत पाटील हे अंतिम निर्णय घेतील. आम्हाला काँग्रेसच निर्णयाची प्रतिक्षा आहे असे सांगीतले.

सांगली महापालिकेच्या २३ रोजी होणार्‍या महापौर , उपमहापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी सांगलीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष संजय बजाज यांच्या उपस्थितीत नगरसेवकांची बैठक सर्किट हाऊस येथे झाली. यावेळी युवक राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष राहुल पवार , महापालिकेतील राष्ट्रवादीचे गटनेते मैनुदीन वागवान , दिग्विजय सूर्यवंशी , विष्ण माने , शेडजी मोहिते . मनगू सरगर , यांच्यासह एकूण सर्व नगरसेवक व एक स्विकृत नगरसेवक उपस्थित होते.

सांगली महापालिकेत काँग्रेस व राष्ट्रवादी हे विरोधी बाकावर आहेत . काँग्रेसचे संख्याबळ १९ व राष्ट्रवादीचे १५ आहे . दोन्ही पक्षांची बेरीज ३४ आहे . सत्ताधारी भाजपकडे ४२ व सहयोगी २ नगरसेवक आहेत . फोडाफोडीच्या राजकारणातून चमत्कार घडेल अशा प्रतिक्षेत काँग्रेस व राष्ट्रवादीची मोट बांधून महापौरपदाची निवडणूक लढवण्याची हालचाल सुरू आहे . या पार्श्‍वभूमिवर काल बैठक झाली. यात संजय बजाज यांनी इच्छूकांची मते आजमावून घेतली. यामध्ये राष्ट्रवादीकडून महापौरपदासाठी आग्रह धरण्यात आला. यात बागवान, सूर्यवंशी , माने इच्छुक आहेत . दरम्यान महापौरपद खुले असल्याने खुल्या प्रवर्गातील नगरसेवकास महापौरपदाची संधी मिळावी अशी मागणी सूर्यवंशी यांनी पक्षाच्या बैठकीत केली. 

दरम्यान कांग्रेस पक्षाचे महापालिकेतील विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर तसेच नगरसेवक मंगेश चव्हाण हे महापौरपदासाठी इच्छु क आहेत.याबाबत महापौर निवडणुकीसाठी काँग्रेसचे नेते राज्यमंत्री विश्वजीत कदम,जयश्रीताई पाटील हे कोणता निर्णय घेतात? विशाल पाटील गटाची भूमिका काय राहणार? याकडे लक्ष लागले आहे .
Edited By - Amit Golwalkar

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख