सहकारमंत्र्यांचा 'सह्याद्री' ठरला साखर निर्यातीत अव्वल; नॅशनल फेडरेशनकडून द्वितीय पुरस्कार 

2019-20 वर्षाच्या साखर उत्पादनाच्या 42 टक्के हे प्रमाण आहे. त्याबद्दल नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅयटरीज्‌ने हा पुरस्कार कारखान्यास जाहीर केला आहे. या पुरस्काराचे वितरण मार्चमध्ये होणार आहे. साखर उद्योगासमोरील जागतिक आव्हाने व भारतातील साखर उद्योगाच्या नावीन्यपूर्ण वाढीस दृष्टिकोन या विषयावरील परिषदेत समारंभपूर्वक करण्यात येणार आहे.
Co-operation Minister's 'Sahyadri' became the top sugar exporter
Co-operation Minister's 'Sahyadri' became the top sugar exporter

कऱ्हाड : नवी दिल्लीतील नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज्‌ या संस्थेकडून जास्तीतजास्त साखर निर्यात केल्याबद्दलचा राष्ट्रीय पातळीवरील द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार कऱ्हाडच्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्यास जाहीर झाला आहे. या कारखान्याचे अध्यक्ष सहकारमंत्री तथा साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील हे आहेत.

देशाला परकीय चलन उपलब्ध होऊन अर्थव्यवस्था मजबूत होण्यासाठी केंद्र सरकारने साखर निर्यात करण्याबाबत जाहीर केलेल्या योजनेंतर्गत सन 2019-20 या आर्थिक वर्षात सह्याद्री सहकारी साखर कारखान्याने अध्यक्ष व सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्गर्शनाखाली पाच लाख 80 हजार 730 क्विंटल साखरेची निर्यात केली. मोठ्या प्रमाणात साखर निर्यात करण्यात आली.

2019-20 वर्षाच्या साखर उत्पादनाच्या 42 टक्के हे प्रमाण आहे. त्याबद्दल नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅयटरीज्‌ने हा पुरस्कार कारखान्यास जाहीर केला आहे. या पुरस्काराचे वितरण मार्चमध्ये होणार आहे. साखर उद्योगासमोरील जागतिक आव्हाने व भारतातील साखर उद्योगाच्या नावीन्यपूर्ण वाढीस दृष्टिकोन या विषयावरील परिषदेत समारंभपूर्वक करण्यात येणार आहे. कारखान्यास हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल कारखान्याचे अध्यक्ष व सहकारमंत्री पाटील व संचालक मंडळाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com