बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार मुख्यमंत्र्यांनी बळकट करावा : प्रवीण दरेकर - Chief Minister should strengthen Balasaheb's idea of ​​Hindutva says BJP leader Praveen Darekar | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार मुख्यमंत्र्यांनी बळकट करावा : प्रवीण दरेकर

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज दादर येथील शिवसेनाप्रमुखांच्या स्मृती स्थळाला भेट देऊन स्मृतींना वंदन केले.

मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असणारे सामाजिक बांधिलकीचे काम आणि बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा दिलेला विचार बळकट व्हावा, यासाठी मुख्यमंत्र्यांनी काम करावे, अशी अपेक्षा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज शिवाजी पार्क येथे कै. ठाकरे यांच्या स्मृतीला आदरांजली वाहताना व्यक्त केली.  

माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात शिवसेनेपासून व भारतीय विद्यार्थी सेनेपासूनच झाली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा आणि सस्कारांचा पगडा माझ्यावर आजही आहे. त्यांच्यामुळे माझी जी जडणघडण झाली, त्याचा फायदा मला आजही विरोधीपक्ष नेतेपदाचे काम करताना होतो, अशा शब्दांत दरेकर यांनी आदरांजली वाहिली.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज दादर येथील शिवसेनाप्रमुखांच्या स्मृती स्थळाला भेट देऊन स्मृतींना वंदन केले. बाळासाहेबांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे. बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असणारे सामाजिक बांधिलकीचे काम आणि बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा दिलेला विचार बळकट व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांनी काम करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख