नास्तिक व अधर्मी असुरांच्या ताब्यात हिंदूंचा कैवारी : बंडातात्यांची ठाकरेंवर टीका - Celebrate Shimga in his name without celebrating Diwali, appealed Bandatatya Karadkar. | Politics Marathi News - Sarkarnama

नास्तिक व अधर्मी असुरांच्या ताब्यात हिंदूंचा कैवारी : बंडातात्यांची ठाकरेंवर टीका

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 9 नोव्हेंबर 2020

यासंदर्भात सोशल मिडियावर त्यांनी प्रसिध्दी केलेल्या पत्रकात म्हटले की, दिवाळीच्या पहिल्या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध केला म्हणून  नरकचतुर्दशीच्या दिवशी अभ्यंग स्नान करतो. पण संपूर्ण भारतातील सर्व मंदिरे खुली असताना महाराष्ट्रातील मंदिरे आपल्या नरकासुराने गेली आठ महिने बंद ठेवली आहेत.

सातारा : देशातील सर्व मंदीरे खुली असताना महाराष्ट्रातील मंदिरे आपल्या नरकासुराने गेली आठ महिने कृष्ण रूपी विठ्ठलाला सत्यभामा रूक्मिणीसह बंदीवासात टाकले असताना आपण कोणता आनंद साजरा करता, असा प्रश्न उपस्थित करून हिंदूंचा कैवारी नास्तिक व अधर्मी असुरांच्या ताब्यात आहे. तो इच्छा असूनही मंदिरे खुली करू शकत नाही. त्यामुळे यावेळी आपण दिवाळी साजरी न करता यांच्या नावाने शिमगा साजरा करा, असे आवाहन बंडातात्या कराडकर यांनी केले आहे. 

यासंदर्भात सोशल मिडियावर त्यांनी प्रसिध्दी केलेल्या पत्रकात म्हटले की, दिवाळीच्या पहिल्या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध केला म्हणून  नरकचतुर्दशीच्या दिवशी अभ्यंग स्नान करतो. पण संपूर्ण भारतातील सर्व मंदिरे खुली असताना महाराष्ट्रातील मंदिरे आपल्या नरकासुराने गेली आठ महिने बंद ठेवली आहेत.

कृष्ण रूपी विठ्ठलाला सत्यभामा रूक्मिणीसह बंदीवासात टाकले आहे. असे असताना आपण कोणता आनंद साजरा करणार आहात. कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानी, माहूरची रेणुका व वणीची सप्तश्रुंगी बंदीस्त असताना कोणत्या लक्ष्मीचे पूजन आपण करणार आहोत. बळीराजा असुर म्हणून वामनाने त्याचे राज्य घेतले.

येथे असुरांचे राज्य असताना कसली बलीप्रतिपदा साजरी करता, असा प्रश्न उपस्थित करून बंडातात्या म्हणाले, राज्यात दारूची दुकाने, भाजी मंडई,
हॉटेल्स, ढाबे, विवाह, पार्ट्यां व पार्टी मिटिंग सर्रास सुर आहेत. मात्र, मंदिरे, वाऱ्या, भजन, सप्ताहांना पूर्ण बंदी आहे. तरीही आपण दिवाळी साजरी करणार आहात का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. 

हिंदूंचा कैवारी नास्तिक व अधर्मी असुरांच्या ताब्यात आहे. तो इच्छा असूनही मंदिरे खुली करू शकत नाही. त्यामुळे दिवाळी साजरी न करता त्यांच्या नावाने शिमगा साजरा करा. अंघोळ करायचीच असेल तर त्यांच्या नावाने व गोड खायचेच असेल तर त्यांच्या चौदाव्याच्या नावाने खा, असे आवाहन बंडातात्यांनी केले आहे. 

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख