आनंदात पण प्रदुषणमुक्त दिवाळी साजरी करा; आरोग्याची काळजी घ्या..! - Celebrate happy but pollution free Diwali; Take care of your health says Shivsena minister Shambhuraj Desai | Politics Marathi News - Sarkarnama

आनंदात पण प्रदुषणमुक्त दिवाळी साजरी करा; आरोग्याची काळजी घ्या..!

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 14 नोव्हेंबर 2020

दिवाळी हा सण दिव्यांचा तसेच प्रकाशाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. या उत्सवात दरवर्षी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते. यावर्षीची दिवाळी प्रदूषणमुक्त साजरी करताना फटाके फोडणे टाळावे. फटाक्यांच्या धुरामुळे वायू प्रदूषणाचा थेट परिणाम श्वसनावर होतो. त्यामुळे श्वसनाचे आजार बळावण्याची शक्यता आहे.

सातारा : दिपावली सणासाठी बाहेरगावी असलेली मंडळी आपल्या गावी परत येऊन कुटुंबासोबत एकत्रितपणे सण साजरा करतात. यावर्षी मात्र, कोरोनाचा संसर्ग सुरु आहे. कोरोना महामारीच्या काळात यंदाची दिवाळी प्रत्येकाने आनंदात पण साधेपणाने साजरी करताना संसर्ग होणार नाही, याची काळजी घ्यावी. प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करावी, असे आवाहन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई जिल्हातील जनतेला केले आहे. 

दिवाळीनिमित्त खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत जाताना प्रत्येकाने दक्षता घ्यावी. सामाजिक अंतर ठेवावे. कोरोनाचा संसर्ग होणार नाही, यासाठी प्रत्येकाने तोंडावर मास्क लावावे. कोणत्याही वस्तूला हात लावल्यानंतर हाताला सॅनिटायझर लावावे. हात साबणाने स्वच्छ धुवावे. संसर्ग कमी झाला असला तरी कोरोना पूर्णपणे गेलेला नाही. हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे.

आरोग्याच्या दृष्टीने प्रत्येकाने दक्ष राहून प्रत्यक्ष भेटीगाठी न घेता समाज माध्यमातून शुभेच्छा संदेश द्यावे. कुठेही गर्दी होणार नाही, याबाबत प्रत्येकाने काळजी घ्यावी. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे प्रत्येकाने पालन करावे. ही दिवाळी घरगुती स्वरूपात मर्यादित राहिल, याची पूर्ण दक्षता घ्यावी.

दिवाळी हा सण दिव्यांचा तसेच प्रकाशाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. या उत्सवात दरवर्षी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते. यावर्षीची दिवाळी प्रदूषणमुक्त साजरी करताना फटाके फोडणे टाळावे. फटाक्यांच्या धुरामुळे वायू प्रदूषणाचा थेट परिणाम श्वसनावर होतो. त्यामुळे श्वसनाचे आजार बळावण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही दिवाळी प्रदूषणमुक्त साजरी करताना दिव्यांची आरास करून हा उत्सव साजरा करावा, असे आवाहन मंत्री देसाई यांनी पाटण विधानसभा मतदारसंघ तसेच जिल्हावासियांना केले आहे. 

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख