धर्मावर आधारित हुकुमशाही आणण्याचा भाजपचा डाव : पृथ्वीराज चव्हाण

ही निवडणुक भाजपाला रोखायची निवडणूक आहे. जिथे भाजपाच्या विचारांना आजवर यश आलं तिथे आपण त्यांना रोखलं तर ज्या कारणाने महाआघाडी सरकार अस्तित्वात आली. ते कारण सफल झाले, असे आपणास म्हणता येईल.
BJP's ploy to bring dictatorship based on religion Says Congress Leader Prithviraj Chavan
BJP's ploy to bring dictatorship based on religion Says Congress Leader Prithviraj Chavan

फलटण शहर : देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व काँग्रेसने दिलेली घटना यांना मान्य नाही. ही घटना निष्प्रभ करुन ते घटना व लोकशाही संपवायला लागले आहेत. त्यांना धर्मावर अधारित असलेली हुकुमशाही देशात आणायची आहे, असा घणाघाती आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षावर केला आहे.

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूकीत काँग्रेस पुरस्कृत शिक्षक मतदार संघाचे उमेदवार प्रा. जयंत आसगावकर व राष्ट्रवादी पुरस्कृत पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अरुण लाड यांच्या प्रचारार्थ फलटणच्या यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर होते. यावेळी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आमदार दीपक चव्हाण, ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे, सुभाषराव सूर्यवंशी-बेडके, ॲड. उदयसिंह पाटील उपस्थिती होते. सातारा जिल्ह्याला यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा आहे. त्यामुळे भविष्यात येऊ घातलेला धोका वेळीच ओळखून या निवडणूकीसाठी मतदान करणे आवश्यक आहे, असे स्पष्ट करुन चव्हाण म्हणाले, देशाची अर्थव्यवस्था कोसळायला लागली आहे.

असलेले कारखाने बंद पडत आहेत. नवीन सुरु होत नाहीत. त्यामुळे रोजगार निर्माण होणार तरी कसा हा प्रश्न आहे. गेल्या पंचेचाळीस वर्षात बेरोजगारीचा सर्वात जास्त दर या वर्षी पहावयास मिळाला आहे. देशाची अर्थव्यवस्था कोव्हिड पुर्वीच कोसळली आहे. मोदी सरकारने नोटबंदी, जीएसटीसारखे हल्ले केल्याने कोव्हिड पुर्वीच अर्थव्यवस्था 3.1 टक्क्यापर्यंत खाली आली.

युपीए सरकारच्या काळात विकास दर साडे नऊ टक्के होता. ही निवडणुक भाजपाला रोखायची निवडणूक आहे. जिथे भाजपाच्या विचारांना आजवर यश आलं तिथे आपण त्यांना रोखलं तर ज्या कारणाने महाआघाडी सरकार अस्तित्वात आली. ते कारण सफल झाले, असे आपणास म्हणता येईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com