पदवीधरमधून भाजपचे देशमुखच विजयी होतील : सुखदेव पाटील यांचा दावा  - BJP's Deshmukh will win from graduates: Sukhdev Patil's claim | Politics Marathi News - Sarkarnama

पदवीधरमधून भाजपचे देशमुखच विजयी होतील : सुखदेव पाटील यांचा दावा 

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 21 नोव्हेंबर 2020

"पुणे पदवीधर मतदारसंघामध्ये संग्रामसिंह देशमुख यांच्यासारखा शांत संयमी व तरुण उमेदवार मिळाल्यामुळे पदवीधर मतदारांना हक्काचा माणूस मिळाला आहे. त्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व सांगली जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष म्हणून केलेले काम पदवीधर मतदारांनी जवळून पाहिले असल्याने त्यांना या निवडणुकीमध्ये निश्‍चित न्याय मिळणार आहे. 

शिराळा : शिराळा विधानसभा मतदारसंघामधून माजी मंत्री शिवाजीराव नाईक व सत्यजीत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख व शिक्षक मतदारसंघातील उमेदवार जितेंद्र पवार मोठ्या फरकाने निवडून येतील, असे प्रतिपादन शिराळा तालुका भाजप अध्यक्ष सुखदेव पाटील यांनी केले. 

बिऊर (ता. शिराळा) येथे मतदाराच्या संपर्क प्रचारावेळी ते बोलत होते. पाटील म्हणाले, "पुणे पदवीधर मतदारसंघामध्ये संग्रामसिंह देशमुख यांच्यासारखा शांत संयमी व तरुण उमेदवार मिळाल्यामुळे पदवीधर मतदारांना हक्काचा माणूस मिळाला आहे. त्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व सांगली जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष म्हणून केलेले काम पदवीधर मतदारांनी जवळून पाहिले असल्याने त्यांना या निवडणुकीमध्ये निश्‍चित न्याय मिळणार आहे. 

शिराळा मतदारसंघातील शिवाजीराव नाईक व सत्यजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते विजयासाठी झोकून काम करतील.'' यावेळी कडेगावच्या सभापती मंदाताई करांडे, जिल्हा परिषद सदस्या शांता कनुंजे, रेश्‍मा साळुंखे, माजी सरपंच मंदाताई पाटील, संजय पाटील, उपसरपंच राजू पाटील, उत्तम पाटील, प्रियांका पाटील, विक्रम पाटील उपस्थित होते.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख