फटक्याने भाजल्याने भाजपच्या खासदार रीता बहुगुणा यांच्या नातीचा मृत्यू  - BJP MP Rita Bahuguna's Grand Daughter dies after being burnt | Politics Marathi News - Sarkarnama

फटक्याने भाजल्याने भाजपच्या खासदार रीता बहुगुणा यांच्या नातीचा मृत्यू 

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020

डॉक्टरांनी सांगितले की, या अपघातात तिचे शरिर ६० टक्के भाजले होते. त्यामुळे उपचारासाठी दिल्लीला हलविण्याचा सल्ला दिला होता. मात्र, दिल्लीत उपचारादरम्यान या चिमुकलीचा आज (मंगळवारी) सकाळी मृत्यू झाला.

प्रयागराज (उत्तरप्रदेश) : उत्तरप्रदेशातील प्रयागराज मतदारसंघातील भाजपच्या खासदार रीता बहुगुणा जोशी यांच्या सहा वर्षाची नात फटाके फोडताना गंभीर जखमी झाली होती. तिचा आज (मंगळवारी) उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

 यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार भाजपच्या खासदार रीता जोशी यांचा मुलगा मयंक जोशी यांची सहा वर्षांची मुलगी दिवाळीत फटाके फोडत होती. फटाके पेटविताना तिच्या कपड्यांनी पेट घेतला. यामध्ये ती गंभीररित्या जखमी झाली होती. तिला तातडीने उपचारासाठी स्थानिक रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, या अपघातात तिचे शरिर ६० टक्के भाजले होते. त्यामुळे उपचारासाठी दिल्लीला हलविण्याचा सल्ला दिला होता. मात्र, दिल्लीत उपचारादरम्यान या चिमुकलीचा आज (मंगळवारी) सकाळी मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी रीता जोशी, त्यांची सून आणि नातीला कोरोनाची लागण झाली होती. 
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख