बिग बॉस फेम अभिजित बिचुकलेंचे नाव मतदार यादीतून गायब.... - Big Boss fame Abhijit Bichukale's name disappears from voter list .... | Politics Marathi News - Sarkarnama

बिग बॉस फेम अभिजित बिचुकलेंचे नाव मतदार यादीतून गायब....

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 1 डिसेंबर 2020

पदवीधरांनी विचार करावे, मतदार यादीतून नावेच गायब होत असतील तर योग्य नाही. निवडणुक झाल्यानंतर मी ही निवडणुक प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी निवडणुक आयोगाकडे आपण करणार असल्याचे श्री. बिचुकले यांनी बोलून दाखविले. 

सातारा : गेली ३६ वर्षे ज्यांच्याकडे हा मतदारसंघ ज्यांच्याकडे होता, त्यांनी माझे नाव मतदार यादीतून गायब केले आहे. मी उमेदवार असून १४ व्या क्रमांकावर माझे उमेदवारांच्या यादीत माझे नाव आहे. पण मतदार यादीत नाव नाही. निवडणुक झाल्यानंतर मी ही निवडणुक प्रक्रियाच रद्द करावी, अशी मागणी निवडणुक आयोगाकडे करणार असल्याचे बीग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी सांगितले.   

साताऱ्यातील महाराजा सयाजीराव विद्यालयातील मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आज सकाळी अपक्ष उमेदवार अभिजित बिचुकले हे पत्नी अलंकृता बिचुकले यांच्यासोबत आले होते. पण त्यांचे मतदार यादीत नावच नसल्याने त्यांना मतदान करता आले नाही. त्यामुळे ते चांगलेच संतप्त झाले आहेत. ते पदवीधर तसेच शिक्षक मतदारसंघातून निवडणुक लढत आहेत. 

यासंदर्भात त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, गेली ३६ वर्षे ज्यांच्याकडे हा मतदारसंघ ज्यांच्याकडे होता, त्यांनी माझे नाव मतदार यादीतून गायब केले आहे. मी उमेदवार असून १४ व्या क्रमांकावर माझे उमेदवारांच्या यादीत माझे नाव आहे. पण मतदार यादीत नाव नाही. या निवडणुकीत होणी दिग्गज नसते.

त्यामुळे मी कोणाकडे तक्रार करण्यापेक्षा त्यानंतर दुपारनंतर मतदान करण्यासाठी येणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील मतदारांना सांगू इच्छितो की, तुम्ही मतदान करताना विचार का. माझे नाव यादीतून गुप्त करण्याचा अधिकार यांना कोणी दिला. या सगळ्या यांच्या शाळा आहेत. ३६ वर्षे ज्यांच्याकडे हा मतदारसंघ होता. त्यांनी माझे नावच गायब केले आहे. मी उमेदवार आहे. पण माझे मतदारयादीत नाव नाही.

माझ्या पत्नीचे नाव आहे, तिने मतदान केले आहे. मतदान करण्याचा अधिकार मला मिळू शकत नाही, मी उमेदवार आहे. यामध्ये कोणाचे तरी शडयंत्र असू शकते. मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांविरोधात तुम्ही निवडणुक लढली आहे. त्यामुळे शिवसेनेला उमेदवारीची भिती वाटली काय, या प्रश्नावर ते म्हणाले, शिवसेनेचा उमेदवार नाही. त्यांची युती आहे.

ते सर्व स्वार्थासाठी एकत्र आले आहेत. त्यांना मलई खायची आहे म्हणून ते एकत्र आले आहेत. पदवीधरांनी विचार करावे, मतदार यादीतून नावेच गायब होत असतील तर योग्य नाही. निवडणुक झाल्यानंतर मी ही निवडणुक प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी निवडणुक आयोगाकडे आपण करणार असल्याचे श्री. बिचुकले यांनी बोलून दाखविले. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख