बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांची कऱ्हाडात बंद खोलीत चर्चा - Balasaheb Thorat, Prithviraj Chavan's discussion in Karad | Politics Marathi News - Sarkarnama

बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांची कऱ्हाडात बंद खोलीत चर्चा

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 9 जानेवारी 2021

औरंगाबादचे नामकरण याबाबत किंवा काँग्रेसमध्ये एक व्यक्ती एक पद असा फॉर्मुल्याबाबत पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केले होते. त्यामुळे या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे. त्या चर्चेमध्ये काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या हालचालींसह विविध विषयांवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.

कऱ्हाड : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसुलमंत्री बाळासाहेब थोरात व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यामध्ये सुमारे अर्धा तास बंद खोलीत चर्चा झाली. यावेळी प्रदेशाध्यक्षपदासह विविध विषयांवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या निधनानंतर कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात उंडाळे येथे गेले होते. त्यानंतर आज शनिवारी सायंकाळी कऱ्हाडला आले होते. त्यावेळी महसुलमंत्री थोरात आणि व माजी मुख्यमंत्री चव्हाण यांच्यात अर्धातास बंद खोलीत चर्चा झाली.

औरंगाबादचे नामकरण याबाबत किंवा काँग्रेसमध्ये एक व्यक्ती एक पद असा फॉर्मुल्याबाबत पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केले होते. त्यामुळे या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे. त्या चर्चेमध्ये काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या हालचालींसह विविध विषयांवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.

यावेळी महसुलमंत्री थोरात यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना बोलावून काही महत्त्वाच्या सूचना केल्या तसेच त्यांच्याकडून जिल्ह्याचा आढावाही घेतला. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, मनोहर शिंदे, शिवराज मोरे, इंद्रजित चव्हाण, हिंदुराव पाटील यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख