आम्ही दारू विकली नाही की आजीची जागा बळकावली नाही...मी कुत्र्यांना घाबरत नाही... - Amol Metkari lashed out at the BJP and central government | Politics Marathi News - Sarkarnama

आम्ही दारू विकली नाही की आजीची जागा बळकावली नाही...मी कुत्र्यांना घाबरत नाही...

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 17 फेब्रुवारी 2021

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार साजरी न करता शासनाने जाहीर केलेल्या १९ फेब्रुवारी रोजी साजरी करावी असे आवाहन आमदार मिटकरी यांनी केले आहे.

सांगली : आम्ही दारू विकली नाही.. की कुठल्या आजीची दोन कोटींची जागा बळकावली नाही..., कुत्र्यांना मी घाबरत नाही, अशा शब्दात पडळकरांचा नामोल्लेख टाळून आमदार अमोल मिटकरी यांनी जहरी टीका केली आहे. 

सांगलीच्या म्हैसाळ येथे शिवचरित्रावरील व्याख्यानात अमोल मिटकरी बोलत होते. मोहनराव शिंदे साखर करखान्याचे अध्यक्ष व राष्ट्रवादीचे नेते मनोजबाबा शिंदे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार अमोल मेटकरी यांचे शिव चारित्रावर व्याख्यानाचे आयोजन म्हैसाळ येथे  केले होते. 

या व्याख्यानात आमदार अमोल मेटकरी यांनी भाजप केंद्र सरकार यांच्यावर आरोपांच्या तोफा डागल्या. पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ, कृषी कायदे या विरोधात दिल्ली येथे बसलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्न भाजप सरकार लक्ष देत नाही. मी नागज फाट्यावर दारू विकली नाही की कोणत्या आजीची दोन कोटींची जमीन बळकावली नाही. मी कुत्र्यांना भीत नाही, अशी नाव न घेतला टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार साजरी न करता शासनाने जाहीर केलेल्या १९ फेब्रुवारी रोजी साजरी करावी असे आवाहन आमदार मिटकरी यांनी केले आहे.

मिटकरी आणि पडळकर यांच्यातील वाद नुकताच गाजला होता. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे अनधिकृत अनावरण केल्याने पडळकर यांच्यावर टिकेची झोड उडाली होती. या दोघांत त्यावरून अनेक चॅनेलवर शाब्दिक युद्ध रंगले होते. पडळकर यांचा बोलविता धनी कोण आहे, याचा शोध घेण्याची मागणी मिटकरी यांनी केली होती. पडळकर यांच्या सांगली जिल्ह्यात जाऊन मिटकरी यांनी ही टीका केल्याने त्याला काय उत्तर मिळणार, याची प्रतिक्षा आहे.  

ही पण बातमी वाचा : काँग्रेस सरकारच्या इंधन दरवाढीवर टीव टीव करणारे अमिताभ-अक्षयकुमार आता गप्प का ?

मुंबई : केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण झाले असून अत्याचाराचा आलेख दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात दररोज वाढ केली जात आहे. सध्या पेट्रोल प्रति लिटर ९६ रुपये तर डिझेल ८६ रुपये लिटर झाले आहे. त्यातच घरगुती वापराचा गॅस सिलेंडर ८०० रुपये झाला आहे. कोराना संकटामुळे लाखो लोकांचे रोजगार हिरावले गेले आहेत. नोकरदार, मध्यम वर्गीयांनाही जगणे कठीण झाले आहे त्याच दरवाढ करून मोदी सरकारने लूट चालवली आहे. मोदी सरकारने इंधन दरवाढ तात्काळ मागे घ्यावी अन्यथा काँग्रेस रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.

गांधी भवन येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना नाना पटोले म्हणाले की, मोदी सरकार देशातील सर्वसामान्य लोकांचे सरकार नसून ते मुठभर लोकांच्या हितासाठी काम करणारे सरकार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती निचांकी पातळीवर आहेत. कच्च्या तेलाच्या आजच्या किंमती पाहता पेट्रोल ३५ रुपये तर डिझेल २५ रुपये लिटर असायला पाहिजे होते पण पेट्रोलने अनेक ठिकाणी शंभरी गाठली आहे. यामुळे महागाई वाढली आहे. सामान्य लोकांचे जगणे कठीण झाले आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तर या दरवाढीसंदर्भात हात वर केले असून पेट्रोल डिझेलच्या किमती आपल्या हातात नसल्याचे राज्यसभेत स्पष्ट केले आहे. भाजपा सरकारने सत्तेवर येताना पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्याचे आश्वासन दिले होते त्या आश्वासनालाही त्यांनी हरताळ फासला आहे. लोकांचे खिसे कापण्यासाठी जनतेने भाजपाला सत्ता दिली का? याचे उत्तर मोदी सरकारने जनतेला दिले पाहिजे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख