महानगरपालिकेच्या मैदानात घूमणार स्वाभिमानीचा शड्डू;  राजू शेट्टी बांधताहेत मोट  - Activists of Swabhimani Shetkari Sanghatana will also contest in the upcoming elections of Kolhapur Municipal Corporation | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात उमुख्यमंत्री अजित पवार राजभवनावर दाखल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही थोड्याच वेळात पोचणार

महानगरपालिकेच्या मैदानात घूमणार स्वाभिमानीचा शड्डू;  राजू शेट्टी बांधताहेत मोट 

सुनील पाटील 
रविवार, 22 नोव्हेंबर 2020

स्वाभिमानीकडून शहरवासियांना त्यांच्या हक्काच्या पायाभूत सुविधा देण्यासाठी पुढाकार घेतला जाईल. महापालिकेचा कारभार पारदर्शक आणि शहरवासियांचा हिताचा करण्यालाच प्राधान्य दिले जाईल. स्वाभिमानी शेतकरी संघटना ज्या प्रमाणे राज्यातील आणि देशातील शेतकऱ्यांसाठी हक्काचा आणि न्यायाचा लढा लढते तोच लढा आता शहरातील लोकांसाठी लढला जाणार आहे.

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात नागरी सुविधांना प्राधान्य देऊन लोकांच्या जिव्हाळेच प्रश्‍न मनापासून आणि तळमळीने सोडविण्याचे काम स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते करतील. यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या होवू घातलेल्या निवडणूकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्तेही उतरणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी "सरकारनामा'शी बोलताना सांगितले. 

श्री शेट्टी म्हणाले, स्वाभिमानीकडून शहरवासियांना त्यांच्या हक्काच्या पायाभूत सुविधा देण्यासाठी पुढाकार घेतला जाईल. महापालिकेचा कारभार पारदर्शक आणि शहरवासियांचा हिताचा करण्यालाच प्राधान्य दिले जाईल. स्वाभिमानी शेतकरी संघटना ज्या प्रमाणे राज्यातील आणि देशातील शेतकऱ्यांसाठी हक्काचा आणि न्यायाचा लढा लढते तोच लढा आता शहरातील लोकांसाठी लढला जाणार आहे.

शहरात असणाऱ्या विविध प्रश्‍नांना मार्ग मोकळा करण्यासाठी स्वाभिमानी महापालिकेच्या निवडणूकीत आपली मोट बांधत आहे. याला निश्‍चित पणे यश येणार आहे. कोल्हापूर शहरातील स्वाभिमानी लोकही शेतकरी संघटनेचे ज्या-त्या प्रभागात उमेदवार असतील त्या प्रभागात चांगली साथ देतील. लोकांना पायाभूत सुविधा आणि त्यांचे राहणीमान उंचावण्यासाठी आवश्‍यक सर्व सुविधांचे नियोजन करुन तसा अजेंडा घेवूनच स्वाभिमानी कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणूकीत उतरणार असल्याचेही श्री शेट्टी यांनी सांगितले.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख