अकलूजची एक जागा विरोधी गटाला गेल्याने धैर्यशील मोहिते पाटलांचा राजकीय संन्यास

अकलूजमध्ये विजयसिंह मोहिते-पाटील यांनी ग्रामपंचायत निवडणुकीची सर्व जबाबदारी धैर्यशील यांच्यावर सोपवली होती. तर यांच्या गटाच्या विरोधात धवलसिंह मोहिते-पाटील यांचा गट देखील या निवडणुकीत कार्यरत आहे. अशा परिस्थितीत विरोधी गटाला केवळ दुर्लक्ष आणि चुकीमुळे एक जागा बिनविरोध निवडून गेल्याचे धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या जिव्हारी लागल्याचे दिसते आहे.
Accepting wrong responsibility, we are retiring politically after the Gram Panchayat elections Says Dhairyashil Mohite Patil
Accepting wrong responsibility, we are retiring politically after the Gram Panchayat elections Says Dhairyashil Mohite Patil

अकलूज : अकलूज ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी माजी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी आपल्यावर सोपविली होती. त्यात केवळ आपल्या चुकीमुळे एक जागा बिनविरोध झाली त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारत आपण ग्रामपंचायत निवडणुकीनंतर राजकीय संन्यास घेणार असल्याची घोषणा धैर्यशील मोहिते-पाटील यांनी अकलूज येथे केली.

विजयसिंह मोहिते पाटीला गटाची अकलूज ग्रामपंचायतीच्या निवडणुक प्रक्रियेची संपूर्ण जबाबदारी माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील, जयसिंह मोहिते- पाटील व मोहिते-पाटील कुटुंबीयांवर प्रेम करणाऱ्या सर्वांनी आपणावर सोपविली होती. गेली 13 वर्षांपासून आपण दिलेली जबाबदारी व्यवस्थित पार पाडत आलो आहोत.

परंतू आपल्या काही अडचणींमुळे अकलूज ग्रामपंचायतीत उमेदवारांचे अर्ज भरताना काही गोष्टींकडे दुर्लक्ष झाले. पाच नंबर प्रभागात सर्वसाधारण महिला गटासाठी एका सामान्य फळ विक्रेती महिलेची उमेदवारी दिली होती. मात्र, आपल्या नावावर बागवान नावाचा एक इसम त्या महिलेकडे जाऊन दोन कागदांवर संबंधित महिलेच्या सह्या घेतल्या आणि त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला.

तर संबंधित महिला उमेदवाराच्या पूरक अर्जामध्ये जातीय प्रवर्गाचा उल्लेख देखील वकिलांकडून चुकीचा झाला. त्यामुळे या ठिकाणी आमच्या पॅनलचा उमेदवार राहिला नाही. प्रसंगी विरोधी उमेदवार बिनविरोध निवडून आला. ही सर्वस्वी जबाबदारी मोहिते-पाटील गटाचा ग्रामपंचायत निवडणुकीतील प्रमुख म्हणून आपली आहे. झालेल्या चुकीची जबाबदारी स्वीकारत आपण ग्रामपंचायत निवडणुकीनंतर राजकीय संन्यास घेत आहोत.

तत्पूर्वी ग्रामपंचायत निवडणुकीतील इतर सर्व उमेदवारांचा प्रचार आपण ताकतीने करू. त्यांना निवडून आणू. मगच राजकारणातून बाहेर पडू. असेही त्यांनी जाहीर केले. वास्तविक अकलूज महाळूंग व नातेपुते ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपरिषद व नगरपंचायतमध्ये होणार त्यामुळे ही निवडणूक
प्रक्रिया थांबवावी यासाठी प्रयत्न केले त्यात महाळूंग ग्रामपंचायती यश आले.

अकलूज मधील सर्व गटांशी अगदी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत बोलणी केली.  यात प्रमोद (अण्णा) कुलकर्णी, नामदेव वाघमारे दत्ता पवार नंदू केंगार, किरण मोरे, किरण भोसले, भारत गायकवाड आदींनी सर्व सामान्य जनतेला होणारा फायदा लक्षात घेऊन सकारात्मक प्रतिसाद दिला. परंतु काही लोकांनी प्रतिसाद न दिल्याने निवडणूक लागली ही निवडणूक सर्व ताकतीने लढू व सर्व उमेदवार निवडून आणू अशी ग्वाही यावेळी मोहिते-पाटील यांनी दिली

अकलूजमध्ये विजयसिंह मोहिते-पाटील यांनी ग्रामपंचायत निवडणुकीची सर्व जबाबदारी धैर्यशील यांच्यावर सोपवली होती. तर यांच्या गटाच्या विरोधात धवलसिंह मोहिते-पाटील यांचा गट देखील या निवडणुकीत कार्यरत आहे. अशा परिस्थितीत विरोधी गटाला केवळ दुर्लक्ष आणि चुकीमुळे एक जागा बिनविरोध निवडून गेल्याचे धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या जिव्हारी लागल्याचे दिसते आहे. परिणामी त्यांनी राजकीय संन्यासाची घोषणा केली.
यानिमित्ताने अकलूज आणि माळशिरस तालुक्याचे राजकारण देखील आगामी काळात वेगळ्या वळणावर जाऊ शकते.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com