'भटक्‍या विमुक्त' शब्दाचा त्याग करणार : लक्ष्मण मानेंचा निर्धार  - Will drop the word 'Bhatakya Vimukta' says Laxman Mane | Politics Marathi News - Sarkarnama

'भटक्‍या विमुक्त' शब्दाचा त्याग करणार : लक्ष्मण मानेंचा निर्धार 

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 23 मार्च 2021

या राष्ट्रीय अधिवेशनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सिताराम येच्युरी, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्यासह विविध मान्यवरांना निमंत्रण देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

सातारा : सातारा येथे झालेल्या भटक्‍या विमुक्त जमाती संघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत 31 ऑगस्टला सोलापूर येथे राष्ट्रीय महाअधिवेशन घेण्याचा निर्णय झाला आहे. यापुढे संघटना भटक्‍या विमुक्त या शब्दाचा वापर करणार नाही. त्यामुळे संघटनेचे नाव बदलून भारतीय आदिवासी जमाती संघम या नावाने कार्य करील.

या अधिवेशनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह विविध मान्यवरांना निमंत्रण देणार असल्याची माहिती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष लक्ष्मण माने यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. श्री. माने म्हणाले, 1871 च्या गुन्हेगार जमाती कायद्याला 31 ऑगस्ट 2021 रोजी 150 वर्षे पूर्ण होत आहेत. हा कायदा 1952 मध्ये दुरुस्त करण्यात आला.

तद्नंतर त्याचे रुपांतर संशयित गुन्हेगारी जमाती कायद्यामध्ये करण्यात आला. हा कायदा संपूर्ण देशासाठी होता. देशभर गुन्हेगारी जमातीच्या वसाहती केल्या होत्या. तीन तारांच्या कंपाऊंडमध्ये या चिन्हांकित जमाती डांबण्यात आल्या होत्या. म्हणजेच खुल्या कारागृहात ठेवण्यात आल्या होत्या. 80 वर्षे इंग्रज सरकारने जन्मत:च गुन्हेगार ठरवून त्यांना गुन्हेगार बनवले होते.

देशभर या कायद्याने अस्तित्वात असलेल्या जमाती, अनुसूचित जमाती किंवा अनुसूचित जाती यांच्या याद्यांमध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र, गुजरात आणि तामिळनाडूमध्ये मात्र तिसरी सूची करण्यात आली आहे. श्री. माने म्हणाले, 31 ऑगस्टला सोलापूर येथे राष्ट्रीय महाअधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. यापुढे संघटना भटक्‍या विमुक्त या शब्दाचा वापर करणार नाही.

त्यामुळे संघटनेचे नाव बदलून भारतीय आदिवासी जमाती संघम या नावाने कार्य करील. या राष्ट्रीय अधिवेशनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सिताराम येच्युरी, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्यासह विविध मान्यवरांना निमंत्रण देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख