ओबीसी नेतृत्व संपविताना भाजपचा कळवळा कुठे गेला होता?  रोहिणी खडसेंचा फडणीसांवर हल्ला - Where did the BJP's compassion go when it ended the OBC leadership? Rohini Khadse attacks fadanvis | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.
महाड तालुक्यातील तळीये गावातील 32 घरांवर दरड कोसळली | दरडीत घरांचे मोठे नुकसान | 72 लोक बेपत्ता झाल्याचा अंदाज| पोलिसांचे पथक घटना स्थळाकडे रवाना

ओबीसी नेतृत्व संपविताना भाजपचा कळवळा कुठे गेला होता?  रोहिणी खडसेंचा फडणीसांवर हल्ला

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 24 जून 2021

ॲड. रोहिणी खडसे यांनी ट्विट करून फडणवीस यांना धारेवर धरले. त्यामुळे भाजप काय उत्तर देणार याकडे लक्ष आहे.

जळगाव : राज्यातील ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना भाजपचा हा कळवळा कुठे गेला होता? असा हल्ला ॲड. रोहिणी खडसे Advt. Rohini Khadse यांनी देवेंद्र फडणवीस Devendra Fadanvis यांच्यावर केला आहे. Where did the BJP's compassion go when it ended the OBC leadership? Rohini Khadse attacks Phadnavis

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात जिल्हा परिषद निवडणुकीत ओबीसी आरक्षित जागा रद्द झाल्यास भाजपतर्फे ओबीसी उमेदवार देण्यात येतील अशी घोषणा त्यांनी केली होती. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या ॲड. रोहिणी खडसे यांनी जोरदार उत्तर दिले आहे.

हेही वाचा : राज ठाकरेंच्या विरोधात एकमेव आमदार राजू पाटील? विमानतळ नामकरण आंदोलनाला जाणार

त्यांनी म्हटले की, भाजपला ओबीसीचा कळवळा कधीपासून यायला लागला? ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता?....आता गळा काढण्यात अर्थ नाही. ॲड. रोहिणी खडसे यांनी ट्विट करून फडणवीस यांना धारेवर धरले. त्यामुळे भाजप काय उत्तर देणार याकडे लक्ष आहे.

आवश्य वाचा : जयकुमार रावल यांच्या नियुक्तीने गिरीश महाजन गट नाराज?

दुसरीकडे त्यांच्या भावजय भाजप खासदार रक्षा खडसे यांच्या नेतत्वाखाली उद्या ओबीसी आरक्षण रद्द करू नये, या मागणीसाठी जळगावात चक्का जाम आंदोलन आहे. रक्षा खडसे या भाजपतर्फे आयोजित ओबीसी बैठकीसाठी मुंबईत उपस्थित होत्या, त्यांना भाजप ओबीसी चेहरा म्हणून पाहत आहे. त्यामुळे खासदार रक्षा खडसे या ॲड. रोहिणी खडसे यांच्या टीकेला उत्तर देणार काय? या कडेही लक्ष आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख