शिवभोजन थाळीची मर्यादा संपल्यास मालोजी शिदोरीतून थाळी उपलब्ध करा.... - When the limit of Shivbhojan plate is over, make the plate available from Maloji Shidori says Rahunathraje Naik Nimbalkar | Politics Marathi News - Sarkarnama

शिवभोजन थाळीची मर्यादा संपल्यास मालोजी शिदोरीतून थाळी उपलब्ध करा....

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 16 एप्रिल 2021

फलटण शहरामधील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अन्नपूर्णा शेतकरी कँटीन येथे शिवभोजन थाळी केंद्र मंजूर आहे. दररोज मोठ्याप्रमाणात शिवभोजन थाळीला प्रतिसाद मिळत आहे. पण या केंद्राला असलेली थाळींची मर्यादा संपल्यास बाजार समितीत येणाऱ्या शेतकऱ्यांसह इतर गोरगरिबांना मोफत अन्न मिळण्यात अडचण होणार आहे.

फलटण : फलटण शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अन्नपूर्णा शेतकरी कँटीन येथे शिवभोजन थाळी केंद्र मंजूर आहे. शिवभोजन थाळीची मर्यादा संपल्यावर मालोजी शिदोरी मधून थाळी उपलब्ध करून द्या. कोणत्याही परिस्थितीमध्ये गरजुंना उपाशी पाठवू नका, असे आदेश कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी दिले आहेत.

सध्या कोरोनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. यामुळे हातावरचे पोट असणाऱ्यांसाठी राज्य शासनाच्या वतीने शिवभोजन थाळी मोफत देण्यास सुरवात केली आहे. या शिवभोजन थाळीचा चांगला प्रतिसाद मिळत असून यातून गोरगरिबांना लॉकडाऊनमध्ये हातभार मिळाला आहे.

यामध्ये फलटण शहरामधील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अन्नपूर्णा शेतकरी कँटीन येथे शिवभोजन थाळी केंद्र मंजूर आहे. दररोज मोठ्याप्रमाणात शिवभोजन थाळीला प्रतिसाद मिळत आहे. पण या केंद्राला असलेली थाळींची मर्यादा संपल्यास बाजार समितीत येणाऱ्या शेतकऱ्यांसह इतर गोरगरिबांना मोफत अन्न मिळण्यात अडचण होणार आहे.

या पार्श्वभूमीवर बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी शिवभोजन थाळीची मर्यादा संपल्यावर मालोजी शिदोरीमधून थाळी उपलब्ध करून द्या. कोणत्याही परिस्थितीमध्ये गरजुंना उपाशी पाठवू नका, अशी सूचना केली आहे. याबाबतची माहिती फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर यांनी दिली आहे.

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख