अर्थसंकल्पाच्या निधीत दिसले सभापतींचे वजन; सातारा जिल्ह्यात सर्वाधिक निधी फलटणला

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी मंजूर करून आणलेला निधी सर्वाधिक आहे. त्यांनी आपले वजन वापरून अर्थसंकल्पातून फलटण मतदारसंघासाठी सर्वाधिक निधी मंजूर करून घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणावर वर्चस्व ठेवलेल्या रामराजे नाईक निंबाळकर यांनी अर्थसंकल्पातही आपले वजन दाखविले आहे.
The weight of the speakers seen in the budget fund; Phaltan has the highest funding in the district
The weight of the speakers seen in the budget fund; Phaltan has the highest funding in the district

सातारा : नुकत्याच झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पातून सातारा जिल्ह्यातील प्रत्येक आमदाराने आपापल्या मतदारसंघासाठी मोठ्याप्रमाणात निधी आणल्याचे जाहीर केले. पण जिल्ह्याच्या राजकारणावर वर्चस्व असलेल्या विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी मात्र, अर्थसंकल्पातून फलटण तालुक्याला सर्वाधिक निधी आणून आघाडी घेतली आहे. यानिमित्ताने राज्याच्या अर्थसंकल्पातही सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे वजन दिसले आहे.
 
राज्याचा अर्थसंकल्पिय अधिवेशन नुकतेच झाले. अधिवेशनानंतर मतदारसंघात परतलेल्या प्रत्येक लोकप्रतिनिधीने अधिवेशनातून आपण मतदारसंघासाठी काय आणले, याचा लेखाजोखा मांडण्यास सुरवात केली आहे. सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीचे तीन, काँग्रेसचा एक, भाजपचे दोन तर शिवसेनेचे दोन आमदार आहेत. यामध्ये पालकमंत्री पद राष्ट्रवादीचे कऱ्हाड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्याकडे आहे.

तर गृहराज्यमंत्रीपद शिवसेनेचे पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांच्याकडे आहे. दोन मंत्री सहा आमदार तसेच विधान परिषदेचे दोन आमदार आहेत. यामध्ये रामराजे नाईक निंबाळकर हे विधान परिषदेचे सभापती आहेत. नुकत्याच झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात जिल्ह्यातील सर्व मतदारसंघातील विविध प्रश्न तेथील लोकप्रतिनिधींनी मांडले. तसेच अर्थसंकल्पिय अधिवेशनात आपापल्या मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी निधीही मंजूर करून आणला.

यामध्ये कराड उत्तर मतदारसंघासाठी पालकमंत्री तथा सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी ५८ कोटी, वाई मतदारसंघासाठी आमदार मकरंद पाटील यांनी ११० कोटी, कोरेगाव मतदारसंघासाठी आमदार महेश शिंदे यांनी ४३ कोटी, पाटण मतदारसंघासाठी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी १०७.६७ कोटी, तर फलटण मतदारसंघांसाठी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व आमदार दीपक चव्हाण यांच्या माध्यमातून तब्बल २७५ कोटी रूपये तर माण-खटाव मतदारसंघासाठी आमदार जयकुमार गोरे यांनी ७६ कोटी, तसेच कऱ्हाड दक्षिण मतदारसंघासाठी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी ६२ कोटी तर सातारा-जावळी मतदारसंघासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी ६८ कोटींचा निधी मंजूर करून घेतला आहे.

 या सर्व आकडेवारीत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी मंजूर करून आणलेला निधी सर्वाधिक आहे. त्यांनी आपले वजन वापरून अर्थसंकल्पातून फलटण मतदारसंघासाठी सर्वाधिक निधी मंजूर करून घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणावर वर्चस्व ठेवलेल्या रामराजे नाईक निंबाळकर यांनी अर्थसंकल्पातही आपले वजन दाखविले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com