वृक्षतोडीमुळेच कोयनेचे पाणी लाल; कारवाईसाठी शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा

सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव भत्ते दिले जात असताना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसे नसल्याचे सांगत सरकार फसवणूक करत आहे.
The water of Koyna is red due to deforestation; Warning of agitation of Shetkari sanghatna for action
The water of Koyna is red due to deforestation; Warning of agitation of Shetkari sanghatna for action

सातारा : कोयना धरण परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे वृक्षतोड झाल्याने पावसाळ्यात धरणातून सोडलेल्या पाण्याच्या प्रवाहाचा रंग लाल व तांबडसर दिसत आहे. हा प्रकार अतिशय गंभीर असून, झाडांची कत्तल करणाऱ्यांना सरकारचे अभय आहे. येत्या महिनाभरात या परिसरातील अनधिकृतपणे वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिला. The water of Koyna is red due to deforestation; Warning of agitation of Shetkari sanghatna for action
 
गेल्या पंधरा दिवसांपूर्वी मुसळधार पावसाने जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागात हाहाकार माजविला होता. या काळात कोयना धरणातून पाणी सोडल्यानंतर लालसर रंगाचे पाणी दिसून आले. हा प्रकार कोयना, चांदोली व राधानगरी या धरणाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड सुरू असल्याने होत आहे, असे सांगून रघुनाथ पाटील म्हणाले, या परिसरातून ट्रक भरून झाडांची कत्तल सुरू असून, राजकीय नेते व प्रशासकीय अधिकारी चोरट्यांना अभय देत आहेत. 

हा प्रकार तत्काळ न थांबविल्यास आंदोलन करण्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे. अनधिकृतपणे झाडांच्या कत्तली करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी वन विभागाला निवेदन देण्यात आल्याचेही पाटील यांनी सांगितले. दरम्यान, सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव भत्ते दिले जात असताना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसे नसल्याचे सांगत सरकार फसवणूक करत आहे. 

भाजपने गेल्या पंचवार्षिकमध्ये व सध्या महाविकास आघाडीने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. पुढील काही दिवसांत शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या कर्जमाफीचे पैसे द्यावे अन्यथा जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला टाळे ठोकणार असल्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष विकास जाधव, शिवाजी नांदखिले, राजेंद्र बर्गे आदी उपस्थित होते. 
 
सदाभाऊ खोत यांच्यावर निशाणा 
सदाभाऊ खोत मंत्री झाले, गोपीचंद पडळकर आमदार आहेत. तुम्हाला कोणत्या पक्षाने ऑफर दिली आहे का, या प्रश्‍नावर रघुनाथ पाटील म्हणाले, ''मी आजपर्यंत कुणालाही आमदारकी मागितली नाही. मात्र, मी ज्यांच्या छातीवर बिल्ले लावले. त्यांनी आमदार, खासदारकी भोगल्याचे सांगत राजू शेट्टी व सदाभाऊ खोत यांच्यावर निशाणा साधला.'' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com