'कृष्णा'च्या निवडणुकीसाठी विश्वजित कदमांची रणनीती ठरली....

मंत्री कदम म्हणाले, ज्येष्ठ विचारवंत यशवंतराव मोहिते यांनी मोठे श्रम घेवून कृष्णा कारखान्याची उभारणी केली. कारखान्यामुळे विभागाचे नंदनवन झाले. भाऊंचे आशिर्वाद घेऊन अनेकजण मोठे झाले. त्यांच्या विचारांना केवळ पतंगराव कदम साहेबांनी जीवंत ठेवले.
Vishwajit's strategy for Krishna's election; Elgar at a public meeting in Islampur
Vishwajit's strategy for Krishna's election; Elgar at a public meeting in Islampur

कऱ्हाड : कृष्णा कारखान्यात Krishna Sugar factory election साम, दाम, दंड व भेद नितीचा अवलंब करून ताकदीनिशी यशवंतराव मोहिते रयत पॅनेलच्या पाठीशी राहणार आहे, अशी घोषणा सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी केली. सभासदांनो तुम्ही ठाम पाठिशी रहा. तुम्हाला कोणतीही अडचण आल्यास विश्वजित कदम Vishwajit Kadam कुठेही कमी पडणार नाही. माझ्या रणनितीने निवडणुक लढत आहे, असेही मंत्री कदम यांनी स्पष्ट केले. Vishwajit Kadam's strategy for Krishna's election; Elgar at a public meeting in Islampur

इस्लामपूर येथे वाळवा तालुका काँग्रेसतर्फे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीद्वारे मंत्री कदम यांनी आज रयत पॅनेलच्या प्रचारात सक्रिय होत रणशिंग फुंकले. तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, युवा नेते जितेश कदम व वाळवा तालुक्यातील यशवंतराव मोहिते रयत पॅनेलचे उमेदवार उपस्थित होते.

मंत्री कदम म्हणाले, ज्येष्ठ विचारवंत यशवंतराव मोहिते यांनी मोठे श्रम घेवून कृष्णा कारखान्याची उभारणी केली. कारखान्यामुळे विभागाचे नंदनवन झाले. भाऊंचे आशिर्वाद घेऊन अनेकजण मोठे झाले. त्यांच्या विचारांना केवळ पतंगराव कदम साहेबांनी जीवंत ठेवले. डॉ. इंद्रजित मोहिते कुटुंबातील एक सदस्य आहेत. कदम कुटुंब सर्व ताकदीनिशी बाबांच्या पाठीशी आहे. उमेदवारांनी मनात कोणताही किंतु न ठेवता ही निवडणूक लढवावी. कार्यकर्त्यांनी गतीने कामाला लागावे. यावेळी बाळासाहेब पाटील, प्रा. अनिल पाटील यांचेही भाषण झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com