विश्वजित कदमांनी प्रचार एका पॅनेलचा केला पण तिघांच्याही बूथला भेट दिली..

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भिमराव दादा पाटील यांच्या तब्बेतीचीही त्यांनी चौकशी केली व कोरोनात सर्वांनी काळजी घ्या, असाही सल्ला दिला.
विश्वजित कदमांनी प्रचार एका पॅनेलचा केला पण तिघांच्याही बूथला भेट दिली..
Vishwajit Kadam campaigned for a panel but visited the booths of all three

काले : कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत असून राज्याचे सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी दुपारी काले येथील मतदान केंद्रास भेट दिली. यावेळी त्यांनी मतदान केंद्राचे अधिकाऱ्याशी संवाद साधून माहिती घेतली. तसेच तेथील तिन्ही बूथला भेट देत मतदानाची माहिती घेतली. त्यांच्या भेटीने तिन्हीही पॅनलच्या उमेदवारांसह कार्यकर्त्यांमध्ये दुपारची मरगळ दूर झाली. त्यांच्या या भेटीची सर्वत्र चर्चा पाहावयास मिळाली. त्यांच्या समवेत युवा नेते नानासाहेब पाटील उपस्थित होते.  

कराड तालुक्यातील कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीसाठी तिरंगी लढत होत आहे. या निवडणुकीचे आज मतदान होते. सकाळपासून चुरशीने मतदान झाले. आज दुपारी राज्याचे सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी काले येथील मतदान केंद्रास भेट दिली. त्यांनी मतदान केंद्राचे अधिकारी यांच्याशी संवाद साधला.

त्यानंतर त्यांनी तेथील तिन्ही बूथला भेट देत मतदानाची माहिती घेतली. त्यांच्या समवेत युवा नेते नानासाहेब पाटील उपस्थित होते. श्री. पाटील त्यांच्याशी केंद्राच्या बाहेर संवाद साधला. तसेच केंद्रावर उपस्थित असलेले युवा नेते विवेक पाटील यांच्यासह सहकार पॅनेलचे उमेदवार दयाराम पाटील यांच्याही संवाद साधला. त्यावेळी जिल्ह्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भिमराव दादा पाटील यांच्या तब्बेतीचीही त्यांनी चौकशी केली व कोरोनात सर्वांनी काळजी घ्या, असाही सल्ला दिला.

संस्थापक पॅनल उमेदवार पांडुरंग पाटील यांचीही त्यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी शिवराज मोरे व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी दयाराम पाटील यांच्या भेटीदरम्यान सारे काही मतदाराच्या हातात आहे, असं म्हणत त्यांनी सर्वांशी हसतमुखाने नमस्कार घालत संवाद साधला. त्यांच्या भेटीने तिन्हीही पॅनलच्या उमेदवारांसह कार्यकर्त्यांमध्ये आलेली दुपारची मरगळ दूर झाली. त्यांच्या भेटीची चर्चा सर्वत्र पाहावयास मिळाली.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in