प्रदेश काँग्रेसवर उंडाळकरांचे चिरंजीव उदयसिंह पाटलांना संधी.... - Undalkar's opportunity to Chiranjeev Udaysinha Patil on Pradesh Congress .... | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोकणासाठी मोठी बातमी : चिपी विमानतळाचा मार्ग मोकळा, DGCE चा परवाना. 9 ऑक्टोबरला उद्घाटन आणि त्याच दिवसापासून प्रवाशी वाहतूक
पंजाबमधील राजकारण पेटले : मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा राजीनामा; नवा मुख्यमंत्री कोण, याची उत्सुकता

प्रदेश काँग्रेसवर उंडाळकरांचे चिरंजीव उदयसिंह पाटलांना संधी....

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 27 ऑगस्ट 2021

गांधी घराण्याने पृथ्वीराज चव्हाणांना संधी देत गांधी घराण्याचे प्रेम त्यांच्यासोबत असल्याचे दाखवून दिले आहेत. 

सातारा : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निवडी जाहीर झाल्या असून यामध्ये सातारा जिल्ह्यातील प्रथमच पाच जणांचा समावेश झाला आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ॲड. उदयसिंह पाटील उंडाळकर, राजेंद्र शेलार, रणजितसिंह देशमुख, अजितराव पाटील चिखलीकर यांचा समावेश आहे. सातारा जिल्ह्यातील नवीन जु्न्या पदाधिकाऱ्यांना प्रदेशवर संधी देण्यात आली आहे. ॲड. उदयसिंह पाटलांना महाराष्ट्राच्या राजकारणात काम करण्याची संधी मिळाली आहे. Undalkar's opportunity to Chiranjeev Udaysinha Patil on Pradesh Congress 

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी के. सी. वेणुगोपाल यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणीच्या निवडी काल रात्री जाहीर केल्या.  यामध्ये सातारा जिल्ह्यातील पाच जणांचा समावेश केलेला आहे. त्यामुळे जिल्हा काँग्रेसमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर शिस्तपालन समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

हेही वाचा : राणेंची जन आशीर्वाद यात्रा पुन्हा सुरु; शिवसेना म्हणते..डिवचण्याचा प्रयत्न केल्यास प्रत्युत्तर देणार

सोनिया गांधींना पत्र लिहिलेल्या दिग्गज २३ नेत्यांमध्ये पृथ्वीराज चव्हाणांचा समावेश होता. त्यामुळे ते काही कालावधीसाठी बाजूला फेकल्यासारखे वाटत होते. पण गांधी घराण्याने पृथ्वीराज चव्हाणांना संधी देत गांधी घराण्याचे प्रेम त्यांच्यासोबत असल्याचे दाखवून दिले आहेत. माजी आमदार कै. विलासराव पाटील उंडाळकर यांचे चिरंजीव ॲड. उदयसिंह पाटील उंडाळकर यांना जनरल सेक्रेटरी पदावर संधी दिली आहे.

आवश्य वाचा :  पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूरमध्ये दोन सदस्यीय प्रभागरचना राहणार..

उदयसिंह पाटील हे काँग्रेस पक्षात सक्रिय होत असताना त्यांच्याकडे युवकचे सरचिटणीस पद दिले होते. त्यानंतर खुप वर्षानंतर उदयसिंह पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीवर संधी देण्यात आली आहे. या संधीमुळे उदयसिंह पाटील यांना महाराष्ट्राच्या राजकारणात काम करण्याची संधी काँग्रेसने दिली आहे. तसेच राजेंद्र शेलार व रणजितसिंह देशमुख यांना प्रदेश सरचिटणीस पदावर संधी दिली आहे. कार्यकारी समितीवर कराडचे अजितराव पाटील चिखलीकर यांचा समावेश केला आहे. अजित पाटील यापूर्वीही प्रदेश कमिटीवर सरचिटणीस म्हणून होते, त्यांना कार्यकारी समितीवर बढती दिली आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख