उदयनराजेंनी रक्तपाताची भाषा करू नये; सरकारचे काम योग्य दिशेने सुरू - Udayanraje should not use the language of bloodshed; The work of the government continues in the right direction | Politics Marathi News - Sarkarnama

उदयनराजेंनी रक्तपाताची भाषा करू नये; सरकारचे काम योग्य दिशेने सुरू

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 15 मार्च 2021

ज्या राज्यांनी ५० टक्यापेक्षा जास्त आरक्षण दिले आहे, त्यांचीही सुनावणी सर्वोच्य न्यायालय एकुण घेणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारची भूमिका भक्कम होणार आहे.

कऱ्हाड : मराठा आरक्षणप्रश्नी महाराष्ट्र सरकारची योग्य दिशेने काम सुरु आहे. मात्र, रक्तपाताची भाषा करुन, उद्रेक करुन, हिंसाचार करुन त्याला वेगळे वळण लावण्याची गरज नाही, असे मत खासदार उदयनराजे भोसले यांच्या वक्तव्यावर गृहराज्य मंत्री देसाई यांनी व्यक्त केले.

मंत्री देसाई म्हणाले, मराठा आरक्षणाची राज्य शासनाची भूमिका स्पष्ट आहे. मंत्री मंडळातील अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जावुन ज्येष्ठ विधीतज्ञ, सिनीअर कौन्सिल यांच्याशी चर्चा करुन मराठा आरक्षण न्यायालयात टिकले पाहिजे, अशी चर्चा नियमीत सुनावनी कोर्टात सुरु होण्यापूर्वी झाली आहे. 

ज्या राज्यांनी ५० टक्यापेक्षा जास्त आरक्षण दिले आहे, त्यांचीही सुनावणी सर्वोच्य न्यायालय एकुण घेणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारची भूमिका भक्कम होणार आहे. त्यामुळे रक्तपाताची भाषा करुन, उद्रेक करुन, हिंसाचार करुन त्याला वेगळे वळण लावण्याची गरज नाही, असे मत मंत्री देसाई यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्या वक्तव्यावर व्यक्त केले. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख