वाळू उपशावरून माण तालुक्यात दोन गटात धुमश्चक्री; नरवणेतील दोघांचा मृत्यू - Two groups clash in Maan taluka over illegal sand subsidence; Death of two in Narwane | Politics Marathi News - Sarkarnama

वाळू उपशावरून माण तालुक्यात दोन गटात धुमश्चक्री; नरवणेतील दोघांचा मृत्यू

रूपेश कदम
बुधवार, 17 मार्च 2021

या प्रकारानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. गावात तणावपूर्ण वातावरण असून संपूर्ण गाव बंद ठेवण्यात आले आहे.

दहिवडी : पंचनामा झालेल्या वाळूचा लिलाव घेतल्यानंतर बेकायदेशीर वाळूचा उपसा होत असल्याच्या तक्रारी झाल्याने माण तालुक्यातील नरवणे येथे बुधवारी दोन गटात धुमश्चक्री उडाली. यामध्ये दोन्ही गटांतील दोघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे माण तालुक्यात खळबळ उडाली असून पोलिस घटनास्थळी रवाना झाले आहे. नरवणे गावात तणावपूर्ण वातावरण असून गाव बंद ठेवण्यात आले आहे. 

चंद्रकांत नाथाजी जाधव व विलास धोंडीबा जाधव अशी मृतांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, नरवणे येथील जप्त केलेल्या वाळूचा १२ मार्चला पंचनामा झाला होता. पंचनामा झालेल्या वाळूचा लिलाव चंद्रकांत जाधव यांनी घेतला होता. परंतू तेथून बेकायदेशीर वाळू उपसा होत असल्याची तक्रार गावकामगार तलाठी यांच्याकडे करण्यात आली होती.

यावरून आज सकाळी गावातील दोन गटात धुमश्चक्री उडाली. यामध्ये दोन्ही बाजूकडून शस्त्रांचा वापर करून एकमेकांवर हल्ला झाला. तलवारीने झालेल्या हल्ल्यात दोन्ही गटातील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात आणखी दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकारानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. गावात तणावपूर्ण वातावरण असून संपूर्ण गाव बंद ठेवण्यात आले आहे.
 

 

सातारा सातारा सातारा 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख