श्रीनिवास पाटलांच्या प्रयत्नांमुळे सातारा सैनिक स्कुलला तीनशे कोटी....  - Three hundred crores to Sainik School due to the efforts of MP Srinivas Patil .... | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

श्रीनिवास पाटलांच्या प्रयत्नांमुळे सातारा सैनिक स्कुलला तीनशे कोटी.... 

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 8 मार्च 2021

मागील तीन वर्षापासून (2017 ते 1019) सरकारकडून याबाबतचे अनुदान सैनिक स्कुलला मिळाले नसल्याचे पत्र सैनिक स्कुलचे प्रिन्सिपल यांनी खासदार श्रीनिवास पाटील यांना दिले होते. यावरून खासदार श्रीनिवास पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना 23 फेब्रुवारी 2020 ला पत्र पाठवून याबाबतची माहिती दिली होती.

सातारा : सातारा : सातारा येथील सैनिक स्कूलला 2017 ते 2019 असे तीन वर्षे राज्य शासनाकडून अनुदान मिळाले नव्हते. याबाबत सैनिक स्कुलचे प्रिन्सिपल यांनी खासदार श्रीनिवास पाटील यांना पत्र देऊन याबाबतची माहिती दिली होती. त्यावरून खासदार श्रीनिवास पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र पाठवून निधी उपलब्ध करण्याची मागणी केली होती. त्यानुसार आज अर्थसंकल्पात सातारा सैनिक स्कूलसाठी 300 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. याबद्दल श्रीनिवास पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सातारा जिल्ह्यातील जनतेच्यावतीने आभार मानले आहेत. 

कै. यशवंतराव चव्हाण यांनी 23 जून 1961 मध्ये सातारा सैनिक स्कुलची स्थापना केली. येथूनच अनेक सैनिक अधिकारी घडले. जिल्ह्यातील बहुतांशी गावातील मुले सैन्यात अधिकारी झाली. सातारा सैनिक स्कुलमध्ये 620 कॅडेटस्‌ शिक्षण घेतात. ही शाळा केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांनी दिलेल्या अनुदानावर चालते, असे सांगून खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, राज्य सरकारसोबत 30 डिसेंबर 2016 मध्ये झालेल्या करारानुसार सैनिक स्कुलच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन, सैनिक स्कुलची देखभाल याची जबाबदारी महाराष्ट्र सरकारने घेतली.

मागील तीन वर्षापासून (2017 ते 1019) सरकारकडून याबाबतचे अनुदान सैनिक स्कुलला मिळाले नसल्याचे पत्र सैनिक स्कुलचे प्रिन्सिपल यांनी खासदार श्रीनिवास पाटील यांना दिले होते. यावरून खासदार श्रीनिवास पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना 23 फेब्रुवारी 2020 ला पत्र पाठवून याबाबतची माहिती दिली होती. कै. यशवंतराव चव्हाण यांनी सुरू केलेल्या सैनिक स्कुलचे प्रलंबित अनुदान देण्याबाबतची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना कराव्यात अशी विनंती केली होती.

तसेच अर्थसंकल्पिय अधिवेशनात याबाबत निधीची तरतूद करावी, अशी मागणीही केली होती. श्रीनिवास पाटील यांनी केलेल्या मागणींचा विचार करून श्री. ठाकरे व श्री. पवार यांनी या अर्थसंकल्पिय अधिवेशनात सातारा सैनिक स्कूलसाठी 300 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामध्ये प्रत्येक वर्षी शंभर कोटी प्रमाणे तीन वर्षे अनुदान उपलब्ध होणार आहे. त्यामुळे खासदार श्रीनिवास पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सातारा जिल्ह्यातील जनतेच्या वतीने आभार मानले आहेत.  

 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख