साताऱ्यात अधिकाऱ्यासह नऊ पोलिसांना कोरोनाचा संसर्ग; कोरोना केअर सेंटर कार्यरत - Ten police tested corona positive in satara | Politics Marathi News - Sarkarnama

साताऱ्यात अधिकाऱ्यासह नऊ पोलिसांना कोरोनाचा संसर्ग; कोरोना केअर सेंटर कार्यरत

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 3 एप्रिल 2021

सातारा पोलिस दलात कोरोनाचा शिरकाव झाल्याने पोलिस ठाण्याच्या पातळीवर आवश्‍यक त्या उपाय योजना राबविण्यावर पुन्हा एकदा भर देण्यात आला आहे. पोलिसांचे कोरोना केअर सेंटर आज पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या उपस्थितीत पुन्हा सुरु करण्यात आले.

सातारा : सातारा जिल्हा पोलिस दलात कोरोनाचा शिरकाव झाला असून आत्तापर्यंत एक अधिकारी आणि नऊ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. या कर्मचाऱ्यांवर उपचार सुरु आहेत. बाधितांची वाढणारी संख्या लक्षात घेत पोलिस दलाचे कोरोना केअर सेंटर पुन्हा कार्यरत करण्यात आले आहे. 

सातारा शहर आणि तालुक्‍यात 129 कोरोना बाधित सापडले असून वाढणारा हा आकडा सातारकरांसाठी आगामी काळात डोकेदुखी ठरणार आहे. कऱ्हाड शहर आणि तालुक्‍यात 80, पाटण तालुक्‍यात 15, फलटण शहर आणि तालुक्‍यात 120 बाधित सापडले आहेत. खटाव तालुक्‍यात 71, माण तालुक्‍यात 29, कोरेगाव तालुक्‍यात 54, खंडाळा तालुक्‍यातील शिरवळ येथे 32 तर लोणंदमध्ये 15, खंडाळ्यात पाच तर उर्वरित ठिकाणी अकरा बाधित सापडले आहेत.

वाई शहर आणि तालुक्‍यात 49, महाबळेश्‍वर शहर, तालुक्‍यात 43, जावली तालुक्‍यात 23 सापडले आहेत. उपचारादरम्यान दोघांचा मृत्यु झाला आहे. सातारा पोलिस दलात कोरोनाचा शिरकाव झाल्याने पोलिस ठाण्याच्या पातळीवर आवश्‍यक त्या उपाय योजना राबविण्यावर पुन्हा एकदा भर देण्यात आला आहे. पोलिसांचे कोरोना केअर सेंटर आज पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या उपस्थितीत पुन्हा सुरु करण्यात आले. साताऱ्यातील एक पोलिस अधिकारी व नऊ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.  

कोरोना अपडेटस 
एकूण घेतलेले नमुने -4,11554 
एकूण बाधित -67,494 
घरी सोडलेले रुग्ण -60,905 
एकूण झालेले मृत्यू -1,912 
उपचारार्थ दाखल रुग्ण-4,677 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख