'कृष्णा'ची निवडणूक प्रक्रिया थांबवा; सातारा, सांगलीतील १२ लाख लोकांना कोरोना संसर्गाचा धोका  - Stop the election process of Krishna Sugar Factory; 12 lakh people in Satara, Sangli at risk of corona infection | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

'कृष्णा'ची निवडणूक प्रक्रिया थांबवा; सातारा, सांगलीतील १२ लाख लोकांना कोरोना संसर्गाचा धोका 

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 23 एप्रिल 2021

प्रत्यक्ष निवडणूकीत मतपत्रिका देणे, शाई लावणे, टेबल, मतपेटीला स्पर्श होणार आहे. त्यातून कोविड संक्रमित होण्याची दाट शक्यता आहे. कोरोनामुक्त मतदार शोधता येणार नाही. बाधितांचा शोध निवडणूक यंत्रणा घेणार नाही. त्यासाठी प्रत्येक मतदानाची रॅपिड कोरोना टेस्टही घेता येईलही, मात्र तेही शक्य नाही. त्यामुळे निवडणूका थांबवाव्यात.

कऱ्हाड : कोरोनाची दुसऱ्या लाटेचा बारकाईने विचार करून इथल्या लोकांना जिवंत ठेवण्यासाठी होऊ घातलेली यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची सार्वत्रिक निवडणूक थांबवावी, अशी मागणी कामेरी (ता. वाळवा) येथील ऊस उत्पादक शेतकरी अनिल पाटील यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे केली आहे. निवडणूकीत सुमारे ३८ हजार सभासद मतदानास पात्र होतील. मात्र निवडणूकीमुळे कऱ्हाड, वाळवा, खानापूर, कडेगांव तालुक्यातील १२ लाख लोकांना  कोरोनाची भिती आहे, असेही निवेदनात म्हटले आहे. 

श्री. पाटील यांनी त्यांचे निवेदन उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, सहकार आयुक्तांनाही पाठवले आहे. कऱ्हाड, वाळवा, खानपूर,  कडेगांव तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांतर्फे विनंती केली आहे. निवेदनात म्हटले की, जगभर कोरोनाची दुसरी लाट पसरते आहे. त्यात सातारा, सांगली जिल्हा पोळला आहे. अशा उद्रेकी स्थितीत यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर 
कारखान्याची निवडणूक मुंबईच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाने होत आहे.

मतदारांची कच्ची यादी प्रसिद्ध झाली आहे. मात्र अजून निवडणूक जाहीर झालेली नाही. सरकारने लॉकडाउन जाहीर केला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असाच वाढत राहिला तर उमेदवारांसह मतदारानाही ती स्थिती धोकादायक आहे. लॉकडाउनमुळे मतदार यादीतील त्रुटींवर हरकत घेण्यास पुण्याला जाता येणार नाही. सांगली जिल्ह्यातील सभासदांना जिल्हा ओलांडून येणार नाहीत. अर्ज प्रक्रिया व निवडणुकीसाठी आवश्यक संपर्क करता येणार नाही.

गर्दी व संपर्क टाळला नाही तर सामान्य लोकांचा नाहक बळी पडेल. निवडणुकीत सुमारे ३८ हजार सभासद मतदानास पात्र  होतीलही पण त्यांच्या संपर्कामुळे कऱ्हाड वाळवा, खानापूर, कडेगाव या तालुक्यातील सुमारे 12 लाख लोकांना कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. प्रत्यक्ष निवडणूकीत मतपत्रिका देणे, शाई लावणे, टेबल, मतपेटीला स्पर्श होणार आहे. त्यातून कोविड संक्रमित होण्याची दाट शक्यता आहे. कोरोनामुक्त मतदार शोधता येणार नाही. बाधितांचा शोध निवडणूक यंत्रणा घेणार नाही. 
त्यासाठी प्रत्येक मतदानाची रॅपिड कोरोना टेस्टही घेता येईलही, मात्र तेही शक्य नाही. त्यामुळे निवडणूका थांबवाव्यात. 

कोरोनाचा प्रादुर्भाव धोक्याचा आहे, त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यास दाखले गोळा करणेही अडचणीचे ठरणार आहे. त्यासाठी होणारी गर्दी टाळता येणार नाही. त्यामुळे बदलत्या स्थितीचा विचार करून जी भयावह स्थिती आहे. त्याचा विचार करून निवडणूक निदान अत्यंत उद्रेकाच्या काळात होऊ नयेत, असे आम्हास वाटते.

- अनिल पाटील (शेतकरी सभासद, कामेरी)

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख