सभापती रामराजे म्हणतात, नागरिकांनो, जबाबदारीचे भान ठेवा : फलटणला मोफत कोरोना केअर सेंटर सुरू 

सद्यःस्थितीमध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग ही चिंताजनक बाब आहे. ही वेळ राजकारण करण्याची नाही. या परिस्थितीमध्ये सर्वांनी एकत्र येऊन काम करणे आवश्‍यक असून, आम्ही जनतेसाठी सदैव उपलब्ध राहणार असल्याची ग्वाही देत रामराजे म्हणाले, "सध्या ऑक्‍सिजन, बेड व औषधे लोकांना जास्तीतजास्त कसे उपलब्ध करून देता येतील, यासाठी आमची खटपट सुरू आहे.
Speaker Ramraje says, citizens, be aware of responsibility: Free Corona Care Center launched in Phaltan
Speaker Ramraje says, citizens, be aware of responsibility: Free Corona Care Center launched in Phaltan

फलटण शहर : कोरोना संसर्गाच्या वाढत्या संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासन आपल्या परीने चांगले प्रयत्न करीत आहे. नागरिकांनीही आता जबाबदारीचे भान ठेवणे अत्यंत आवश्‍यक बनले आहे. या स्थितीत समाजासाठी सर्व सुविधायुक्त शंभर बेडचे मोफत कोरोना केअर सेंटर सुरू करून उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे यांनी पुन्हा एकदा आपला सामाजिक दृष्टिकोन दाखवून समाज हित जपले आहे, असे मत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे. 

फलटणचे उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे यांनी सजाई मंगल कार्यालय येथे शंभर बेडचे सर्व सुविधांयुक्त मोफत कोरोना केअर सेंटर सुरू केले आहे. या सेंटरचा प्रारंभ सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य संजीवराजे निंबाळकर, उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे, प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप, नगरसेवक पांडुरंग गुंजवटे, अमित भोईटे, ऋतुराज भोईटे, किरण भोईटे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

सद्यःस्थितीमध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग ही चिंताजनक बाब आहे. ही वेळ राजकारण करण्याची नाही. या परिस्थितीमध्ये सर्वांनी एकत्र येऊन काम करणे आवश्‍यक असून, आम्ही जनतेसाठी सदैव उपलब्ध राहणार असल्याची ग्वाही देत रामराजे म्हणाले, "सध्या ऑक्‍सिजन, बेड व औषधे लोकांना जास्तीतजास्त कसे उपलब्ध करून देता येतील, यासाठी आमची खटपट सुरू आहे.

परंतु बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे हे अपुरे पडत असून, ते उपलब्ध करण्यासाठी आपणासह आमदार दीपक चव्हाण, संजीवराजे निंबाळकर व अन्य सहकारी सातत्याने प्रयत्नशील असून, या गोष्टींची कमतरता भासू न देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत.''  कोरोना केअर सेंटरमध्ये 28 ऑक्‍सिजन बेड, तर 72 सर्वसाधारण बेड कोरोना बाधितांसाठी तयार करण्यात आले आहेत.

या सेंटरसाठी असलेल्या डॉक्‍टर, नर्सेस व इतर कर्मचारी अशा सुमारे 50 जणांच्या टीमची जबाबदारी नंदकुमार भोईटे यांनी घेतलेली आहे, असे प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांनी प्रास्ताविकात सांगितले. यावेळी तहसीलदार समिर यादव, मुख्याधिकारी प्रसाद काटकर, गटविकास अधिकारी अमिता गावडे, पोलिस निरीक्षक भारत किंद्रे आदींची उपस्थिती होती. उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे यांनी आभार मानले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com