पीपीई किट घालून सातारच्या एसपी पोहोचल्या कोरोना वॉर्डमध्ये - SP of Satara arrived in Corona ward wearing PPE kit | Politics Marathi News - Sarkarnama

पीपीई किट घालून सातारच्या एसपी पोहोचल्या कोरोना वॉर्डमध्ये

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 15 जुलै 2020

पोलिस बाधित झाल्याचे आढळून येताच पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सकाळी वाई पोलिस ठाणे व उपअधीक्षक कार्यालयाला भेट दिली. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी रुग्णालयात जाऊन बाधित पोलिस कर्मचाऱ्यांची भेट घेतली. त्यांना प्रकृतीची काळजी घेण्यास सांगितले. 

सातारा : संघनायक कसा असावा याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते. गेल्या काही दिवसांत सातारा जिल्ह्यात पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा होऊ लागली आहे. एक दोन नव्हे तब्बल तेरा कर्मचारी कोरोनाबाधित झाल्याने स्वतः तेजस्वी सातपुते पीपीई घालून कोरोना वॉर्डमध्ये गेल्या. त्यांनी बाधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची अस्थेवायिकपणे चौकशी केली.

याबरोबरच काळजी करू नका, आम्ही सर्व तुमच्या व तुमच्या कुटुंबियांसोबत आहोत, असा दिलासा दिला. तर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कोरोना काळातील अखंड सेवेबद्दल व्टिटच्या माध्यमातून कौतूक केले. 

वाई येथील पोलिस ठाण्यात तेरा पोलिस कर्मचारी कोरोनाबाधित झाल्याने पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे काल विलगीकरण करण्यात आले आहे. तसेच वाई पोलिस ठाण्याचे कामकाज तीन दिवस स्थगित करून भुईंज पोलिस ठाण्यातून हे कामकाज चालविण्यात येणार आहे.

सोमवारी रात्री वाई शहरात 28 कोरोनाबाधित रूग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. यामध्ये वाई पोलिस ठाण्यातील वाहतूक  शाखेचे व इतर असे एकुण 13 कर्मचारी सोमवारी कोरोनाबाधित झाल्याचे आढळून आले. यामुळे जिल्हा पोलिस दलात खळबळ उडाली. त्यामुळे वाई पोलिस ठाण्यातील चार अधिकारी व 50 कर्मचाऱ्यांचे विलगीकरण करण्यात आले आहे.

पोलिस ठाण्यातील व उपअधीक्षक  कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे चाचणीसाठी घशातील स्त्रावाचे नमुने घेण्यात आले आहेत. या सर्वांचा अहवाल दोन दिवसांत येईल. पोलिस ठाण्यातील एकदम तेरा कर्मचारी बाधित आढळून आल्याने जिल्हा पोलिस दलात एकच खळबळ उडाली. 

पोलिस बाधित झाल्याचे आढळून येताच पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सकाळी वाई पोलिस ठाणे व उपअधीक्षक कार्यालयाला भेट दिली. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी रुग्णालयात जाऊन बाधित पोलिस कर्मचाऱ्यांची भेट घेतली. त्यांना प्रकृतीची काळजी घेण्यास सांगण्यात आले.

त्यांनी पोलिस ठाण्यातील व उपअधीक्षक विभागीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांशी
संवाद साधला.  कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव झाल्यास त्यापासून स्वतःची व कुटुंबीयांची कशी काळजी घ्यावी, याचे मार्गदर्शन केले. पालिकेच्या वतीने ताबडतोब पोलिस ठाण्याचे, उपअधीक्षक कार्यालय व पोलिस वसाहतीचे निर्जंतुकीकरण करण्याची प्रक्रिया सकाळपासून सुरू होती.

पोलिस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांचेही विलगीकरण करण्यात आले असून सहवासीत व कुटुंबीयांचे नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले आहेत.  दरम्यान,एसपी तेजस्वी सातपुते यांनी पीपीई किट घालून कोरोना वॉर्डमध्ये पोहोचल्या. त्यांनी बाधित कर्मचाऱ्यांची अस्थेवायिकपणे विचारपूस केली. तसेच काळजी करू नका, आम्ही सर्व तुमच्या व तुमच्या कुटुंबियांसोबत आहोत, असा दिलासा दिला.

तर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कोरोना काळातील अखंड सेवेबद्दल व्टिटच्या माध्यमातून कौतूक केले.  पोलिस कर्मचाऱ्यांबरोबर पोलिस ठाण्यापासून शंभर मीटर अंतरावरील मासे व चिकन विक्रेता व त्यांच्या कुटुंबियांतील 18 व्यक्ती बाधित आढळून आल्या आहेत. वाई तालुक्‍यात 183 रुग्ण बाधित असून, 97 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सहा बाधितांचा मृत्यू झाला आहे. 80 रुग्ण उपचार घेत आहेत. शहरात 59 रुग्ण, तर पसरणीत 19 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे बाजारपेठेसह अर्धे-अधिक शहर
प्रतिबंधित क्षेत्र म्हणून बंद आहे. 

वाई पोलिस ठाण्यातील कर्मचारी बाधित झाले आहेत. अधिकारी, कर्मचाऱ्यांना विलगीकरणात राहण्यास सांगण्यात आले आहे. त्यांचे स्त्रावाचे नमुने चाचणीसाठी पाठविले आहेत. त्याचा अहवाल येईपर्यंत तीन दिवस वाई पोलिस ठाण्यातून होणारे कामकाज तीन दिवसांसाठी स्थगित करण्यात आले आहे. भुईंज पोलिस ठाण्यातून येथील कामकाज चालेल.

 - तेजस्वी सातपुते, पोलिस अधीक्षक, सातारा.  

 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख