सिंधुदुर्गाची वाटचाल संपूर्ण लॉकडाऊनकडे... - Sindhudurg's journey towards complete lockdown | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

सिंधुदुर्गाची वाटचाल संपूर्ण लॉकडाऊनकडे...

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 16 जून 2021

राज्याच्या एकूण पॉझिटिव्ह दरांमध्ये सातत्याने घसरण होत असली तरी कोकणातील या तीन जिल्ह्यांमध्ये मात्र पॉझिटिव्ह संख्या नियंत्रणात येऊ शकलेली नाही.

कणकवली : कोकणाला तौक्ते चक्रीवादळाने आणि सध्याच्या पावसाने हैराण केले असतानाच कोरोना संक्रमणही नियंत्रणाबाहेर चालले आहे. कोरोनाची लागण आणि मृत्यूदरात सातत्याने वाढ सुरू असल्याने रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांची संपूर्ण लॅाकडॉउनच्या Corona Lockdown दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. Sindhudurg's journey towards complete lockdown

सिंधुदुर्गात दररोज सरासरी ६०० कोरोना रुग्ण आढळत असल्याने प्रशासनाच्या चिंतेतही वाढ झाली आहे. याची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली आहे. या आठवड्यात पॉझिटिव्ह दर खाली न आल्यास संपूर्ण लॉकडाउनची टांगती तलवार आहे. सध्या कणकवली आणि या तालुक्यातील काही गाव हे हॉटस्पॉट बनू लागली आहेत. 

हेही वाचा : Covishield: लसीच्या दोन डोसमधील अंतर कुणाच्या सल्ल्यावरून दुप्पट?..

राज्याच्या एकूण पॉझिटिव्ह दरांमध्ये सातत्याने घसरण होत असली तरी कोकणातील या तीन जिल्ह्यांमध्ये मात्र पॉझिटिव्ह संख्या नियंत्रणात येऊ शकलेली नाही. गतवर्षीच्या तुलनेत यंदा जूनमध्ये कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने जोर धरला आहे. आगामी काळातील सार्वजनिक उत्सव लक्षात घेता कोरोनाचे नियंत्रण पुढच्या महिन्याभरात होणे आवश्यक आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख