अविनाश मोहितेंना तुरुंगात टाकण्याचे पाप फेडावे लागणार..  - The sin of imprisoning Avinash Mohite will have to be paid says Dr. Indrajit Mohite | Politics Marathi News - Sarkarnama

अविनाश मोहितेंना तुरुंगात टाकण्याचे पाप फेडावे लागणार.. 

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 1 एप्रिल 2021

गेल्या दोन-तीन महिन्यांपासून निवडणूकीत दोन पावले मागे-पुढे सरकण्याची माझी तयारी आहे. परंतु अविनाश मोहिते हट्टी आहेत. वेळेवर निर्णय न झाल्याने एकत्रीकरण मावळत चालले आहे. डॉ. सुरेश भोसले यांनी सहा वर्षात कडेगांव व खानापूर तालूक्‍यातील सहाशे सभासदांचे सक्तीने राजीनामे घेतले आहेत. साडेपाच हजार सभासदांना मतदानापासून वंचित ठेवले आहे. 

रेठरे बुद्रुक : अविनाश मोहिते यांना चालता येत नाही, अशा स्थितीत त्यांना तरूगांत टाकण्याचे पाप डॉ. सुरेश भोसले यांनी केले आहे. ते त्यांना या निवडणूकीत हे पाप फेडावे लागणार आहे, असा आरोप भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते यांनी केला. तसेच कृष्णा कारखान्याच्या निवडणूकीत आघाडी व्हावी, यासाठी आम्ही सकारात्मक आहोत. मात्र अविनाश मोहिते यांची हट्टवादी भूमिका समाजहिताच्या आड येणारी आहे., अशाही आरोप त्यांनी केला 

वडगाव हवेली येथे बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र जगताप, डॉ. सुधीर जगताप, रामचंद्र भीमराव जगताप, आनंदराव जगताप, माजी सरपंच राजन संदे, संजय पाटील, सतीश पाटील उपस्थित होते. डॉ. मोहिते म्हणाले, आमचा गट व अविनाश मोहिते गटाच्या आघाडीबाबत अद्याप सकारात्मक चर्चा आहे. आघाडी करताना एकत्रित लक्ष्य पाहिजे. परस्पर विरोधी लक्ष उपयोगाचे नाही.

गेल्या दोन-तीन महिन्यांपासून निवडणूकीत दोन पावले मागे-पुढे सरकण्याची माझी तयारी आहे. परंतु अविनाश मोहिते हट्टी आहेत. वेळेवर निर्णय न झाल्याने एकत्रीकरण मावळत चालले आहे. डॉ. सुरेश भोसले यांनी सहा वर्षात कडेगांव व खानापूर तालूक्‍यातील सहाशे सभासदांचे सक्तीने राजीनामे घेतले आहेत. साडेपाच हजार सभासदांना मतदानापासून वंचित ठेवले आहे. 

त्या कुरघोड्यातून नुरा कुस्ती खेळण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव आहे. अविनाश मोहिते यांनी अध्यक्ष असताना अक्रियाशीलतेची पावले उचलली. तर डॉ. सुरेश भोसले यांनी त्या प्रक्रियेस गती दिली. या प्रक्रियेस संचालक मंडळाच्या बैठकीत प्रोसिडींग कायम करताना अविनाश मोहितेंनी विरोध का केला नाही.

त्यामुळे सभासदांच्या अक्रियाशीलतेला सुरेश भोसले व अविनाश मोहिते जबाबदार आहेत. कृष्णा कारखान्यात ऊसाचे गेटकेन आणायचे. व सभासदांचा ऊस जयवंत शुगर्सला न्यायचा. हे काय लफडं आहे. यावेळी आनंदराव जगताप यांचे भाषण झाले. डॉ. सुधीर जगताप यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख