हिंदुत्वाच्या विरोधात शिवसेना काँग्रेस, एमआयएमच्याही पुढे गेलीय..... - Shivsena has gone ahead of Congress and MIM against Hindutva ..... | Politics Marathi News - Sarkarnama

हिंदुत्वाच्या विरोधात शिवसेना काँग्रेस, एमआयएमच्याही पुढे गेलीय.....

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 17 जून 2021

प्रभू रामचंद्र हे समस्त हिंदूंचे दैवत आहे. त्यांचे मंदीर व्हावे म्हणून संपूर्ण देशात सर्वजण प्रयत्न करत आहेत. त्यासाठी मुस्लिम बांधवांनीही पाठींबा दिला आहे. परंतू शिवसेना त्याला विरोध करीत आहे. विरोधाला विरोध करण्यासाठी कुठल्याही विषयावर बोलायचे यापेक्षा दूर्दैव नाही. शिवसेनेची अधोगतीकडे वाटचाल सुरू झालेली आहे, असेही त्यांनी नमुद केले. 

जळगाव : आपल्या विरोधात कोणी बोलले तर त्यांना थेट मारहाण करण्याची भूमिका सत्ताधारी शिवसेना Shivsena घेत आहे. त्यांना आता उतरती कळा लागली आहे. त्यांचा हिंदुत्वाला विरोध तर आता काँगेस Congress, एमआयएम MIM पेक्षाही पुढे गेला आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार गिरीश महाजन Girish Mahajan यांनी केली. Shivsena has gone ahead of Congress and MIM against Hindutva .....

जळगाव येथे भारतीय जनता पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. महाजन म्हणाले, काल मुंबई येथे भाजप कार्यकर्त्यांनी रामजन्मभूमी समर्थनार्थ मोर्चा काढला होता. त्यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांनी थेट त्यांना मारहाण केली. आपल्या विरोधात कोणी बोलले तर त्यांना थेट मारहाण करणे ही सत्ताधारी शिवसेना पक्षाची भूमिका चुकीची आहे. शिवसेना हिंदुत्वाच्या विरोधात एवढ्या टोकाच्या विरोधात जाईल असे मला स्वप्नातही वाटले नव्हते.

हेही वाचा : ओबीसी आरक्षणप्रश्‍नी केंद्र विरुद्ध राज्य सरकार संघर्ष?

आज शिवसेनेचा हिंदुत्व विरोध हा काँग्रेस व एमआयएम पेक्षाही अधिक असल्याचे दिसत आहे. श्रीराम जन्मभूमी त राममंदिर व्हावे यासाठी मुस्लिम समाजनेही पाठिंबा दिला आहे. परंतु शिवसेना त्याला विरोध करीत आहे, केवळ विरोधाला विरोध करीत असून एवढी वाईट वेळ शिवसेनेवर यापूर्वी कधीही आली नव्हती, असेही त्यांनी नमुद केले. आजच्या बैठकीचे नियोजन कशासाठी होते, या प्रश्नावर महाजन म्हणाले, पक्षाने दिलेल्या कार्यक्रमांच्या संदर्भात आजची ही बैठक होती.

आवश्य वाचा : मर्जीतील लोकांना दिले शिवभोजनचे कंत्राट, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार...

वेगवेगळे विषय घेऊन आम्ही जनतेपुढे जाणार आहोत. जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची ही बैठक होती. आर्थिक गुन्हे शाखेने छापे टाकून आपले निकटवर्तीय जितेंद्र पाटील यांना ही अटक केली आहे. याविषयी विचारले असता ते म्हणाले, अगदी भागवतराव भगवाळेपासून पाटलांपर्यंत सगळेच निकटवर्तीय आहेत. त्यांना अटक झालेली आहे, नियमाप्रमाणे काय असेल ते होईल, असे त्यांनी नमुद केले. 

राममंदीर मुद्द्यावर भाजप शिवसेना आमने सामने येत आहे, याकडे कसे पहाल, यावर श्री. महाजन म्हणाले, शिवसेनेला काय बोलावे हेच समजत नाही. त्यांनी केवळ विरोधाला विरोध करण्याचेच ठरविले आहे. कालच प्रकार अत्यंत वाईट आहे. शिवसेना आपल्या मुळतत्वापासून भरकटेल, असे स्वप्नातही वाटले नव्हते. काँग्रेस व एमआयएमच्या पुढे जाऊन शिवसेनेने हिंदूत्वाला विरोध करण्याची भूमिका घेतली आहे.

प्रभू रामचंद्र हे समस्त हिंदूंचे दैवत आहे. त्यांचे मंदीर व्हावे म्हणून संपूर्ण देशात सर्वजण प्रयत्न करत आहेत. त्यासाठी मुस्लिम बांधवांनीही पाठींबा दिला आहे. परंतू शिवसेना त्याला विरोध करीत आहे. विरोधाला विरोध करण्यासाठी कुठल्याही विषयावर बोलायचे यापेक्षा दूर्दैव नाही. शिवसेनेची अधोगतीकडे वाटचाल सुरू झालेली आहे, असेही त्यांनी नमुद केले. 

मुख्यमंत्री मंत्रालयाची पायरी कधी चढणार.....
मुख्यमंत्री अनेक दिवसांपासून मंत्रालयात गेलेले नाहीत, याविषयी तुम्ही आजच्या भाषणात टीका केली आहे. काय नेमके कारण आहे, या विषयी ते म्हणाले मुख्यमंत्री १४ ते १५ महिन्यांपासून मंत्रालयाची पायरी चढलेले नाहीत. मंत्रालयाचे तोंड बघत नाही, कशी कामे होणार जनतेची, असा प्रश्न करून फायलींचे ढिगच्या ढिग पडलेले आहेत. त्यावर सह्या होत नाहीत. मुख्यमंत्री महोदय भेटायलाच जात नाहीत, या विषयी काय बोलावे हेच मला कळत नाही. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख