शंभूराज देसाईंच्या संकल्पनेतून कोयनानगरला होणार पोलिस पर्यटन केंद्र - Shambhuraj Desai's concept Koynanagar will be a police tourism center | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

शंभूराज देसाईंच्या संकल्पनेतून कोयनानगरला होणार पोलिस पर्यटन केंद्र

विजय लाड 
मंगळवार, 9 मार्च 2021

पोलिस प्रशिक्षण केंद्र मंजूर करण्यासाठी मैदान, निवासस्थान, शस्त्रागार, मेस, भांडार, ग्रंथालय आदी गोष्टींची गरज लागते. कोयनानगरात जलसंपदा विभागाच्या अधिपत्याखालील अनेक निवासस्थाने वापराविना पडून आहेत. ही निवासस्थाने गृह विभागाला भाडेतत्त्वावर घेऊन तेथे पोलिस प्रशिक्षण पर्यटन केंद्र ही संकल्पना राबविता येणार आहे.

कोयनानगर : महाराष्ट्र शासनाने अर्थसंकल्पात येथे पोलिस प्रशिक्षण केंद्र उभारण्यास परवानगी दिलेली आहे. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून पर्यटकांचे आवडते डेस्टिनेशन असणाऱ्या कोयनानगरात गोवा राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात प्रथमच पोलिस प्रशिक्षण पर्यटन केंद्र योजनेच्या माध्यमातून "पोलिसिंग पर्यटन'ही अभिनव योजना सुरू होत आहे. या योजनेमुळे येथे राखीव पोलिस निरीक्षक व अप्पर पोलिस अधीक्षकपदाबरोबर कार्यालयाची निर्मिती होणार असल्याने कोयनानगरला पोलिस छावणीचे स्वरूप येणार आहे. 

गोवा पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. पर्यटकांमुळे हाउसफुल्ल असणाऱ्या या ठिकाणी अनेक अप्रिय घटना घडतात. गोव्यात पर्यटनाचा मनमुराद आस्वाद घेण्यासाठी बाहेरून येणाऱ्या पर्यटकांची मोठ्या प्रमाणात लुटालूट होत असल्याच्या तक्रारी पर्यटकांकडून होतात. यामध्ये चेन स्नॅचिंग, लुटालूट, आर्थिक फसवणूक, महिलांची छेडछाड अशा तक्रारी आहेत.

अनेक वेळा रेस्क्‍यू ऑपरेशन सुध्दा करावे लागते. तक्रारींचे तातडीने निवारण करण्यासाठी गोवा सरकारने पोलिसिंग पर्यटन नावाचा "टास्क फोर्स' तयार केला आहे. त्यातून तक्रारींचे निवारण गोव्यात केले जात आहे. राज्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यात दाखल तक्रारी सोडवताना त्याचा तपास करताना पोलिस यंत्रणेवर मोठा ताण असतो.

त्यातच पर्यटकांच्या तक्रारीचा ओघ जादा असल्याने तक्रारींचे तातडीने निवारण करण्यासाठी गोवा राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने "टास्क फोर्स'च्या माध्यमातून पोलिसिंग पर्यटन संकल्पनेचा पुरस्कार केला आहे. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पुढाकार घेऊन कोयनानगर येथे ही संकल्पना राबवून त्याला मूर्तस्वरूप दिले आहे.

पोलिस प्रशिक्षण केंद्र मंजूर करण्यासाठी मैदान, निवासस्थान, शस्त्रागार, मेस, भांडार, ग्रंथालय आदी गोष्टींची गरज लागते. कोयनानगरात जलसंपदा विभागाच्या अधिपत्याखालील अनेक निवासस्थाने वापराविना पडून आहेत. ही निवासस्थाने गृह विभागाला भाडेतत्त्वावर घेऊन तेथे पोलिस प्रशिक्षण पर्यटन केंद्र ही संकल्पना राबविता येणार आहे.

त्यामुळे येथे राखीव पोलिस निरीक्षक कार्यालयासह, अप्पर पोलिस अधीक्षक ही दोन महत्त्वाची पदे अस्तित्वात येण्याची चिन्हे आहेत. महाविकास आघाडीने राज्यात पर्यटन वाढावे, यासाठी पर्यटनपूरक धोरण स्वीकारले आहे. याचाच एक भाग म्हणून शासनाने पोलिसिंग पर्यटन पर्यायाचा स्वीकार केला असल्याचे अधोरेखित होत आहे. 

केवळ 86 दिवसांत मंजुरी....

राज्याचे गतिमान गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी विकासाच्या व्याख्येतून या केंद्राची निर्मिती केलेली आहे. गतवर्षी दहा डिसेंबर रोजी कोयना दौऱ्यावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आलेले असताना श्री. देसाई यांनी ही संकल्पना त्यांना सांगितलेली होती. मुख्यमंत्री ठाकरे यांना ही संकल्पना त्याचक्षणी पसंद पडल्यामुळे त्यांनी तातडीने याला "ग्रीन सिग्नल' दिला होता. केवळ 86 दिवसांत मंजुरीचा सोपस्कार पार पडला आहे. (कै.) गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यानंतर पोलिस प्रशिक्षण केंद्र आपल्या तालुक्‍यात आणणारे, गृहखात्याला दिशा देणारे उत्कृष्ट गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे ठरले आहेत. 

"पाटण तालुक्‍यातील कोयनानगर येथे पोलिस प्रशिक्षण पर्यटन केंद्र शासनाने मंजूर केले आहे. ही अतिशय समाधानाची बाब आहे. यामुळे पाटण व खासकरून कोयनानगर भागातील लोकांना ट्रेनिंग मिळण्यास मदत होणार आहे. यामुळे कोयना भागात रोजगारनिर्मिती होणार आहे. या ठिकाणी पोलिस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती होणार आहे.'' 

- अजय कुमार बन्सल (पोलिस अधीक्षक, सातारा) 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख