ताफा थांबवून गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी केली अपघातग्रस्त महिलेला मदत - Shambhuraj Desai stopped the convoy and helped the injured woman | Politics Marathi News - Sarkarnama

ताफा थांबवून गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी केली अपघातग्रस्त महिलेला मदत

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 21 डिसेंबर 2020

एसटी चालकाचीच चुकी असल्याचे तेथे उपस्थित असलेल्या नागरीकांनी सांगितले. हे एकुण अपघातग्रस्त एसटीच्या चालकास शंभूराज देसाई यांनी चांगलेच  सुनावले. मंत्री देसाई यांनी वेळीच दाखविलेली माणुसकी उपस्थित अनेकांना भावली.

सातारा : साताऱ्यातील जुन्या आरटीओ चौकात एसटी आणि कारचा अपघात झाला.  त्याचवेळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या गाड्यांचा ताफा तेथून निघाला होता.  अपघात झालेला पाहून मंत्री देसाई यांनी गाड्यांचा ताफा थांबविला. गाडीतून खाली उतरले  अन्‌ त्यांनी प्रथम जखमी महिलेची चौकशी केली. तिच्या लहान मुलाला उचलून घेतले. तसेच तेथील पोलिस अधिकाऱ्याला या जखमींना तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेण्याच्या सुचना केल्या. मंत्रीपणाचा डामडौल बाजूला ठेऊन मंत्री देसाई यांनी गाडीतून खाली उतरून अपघातग्रस्तांना केलेली मदत अनेकांना भावली. 

साताऱ्यातील जुन्या आरटीओ चौकात एसटी आणि कारचा अपघात झाला होता. त्यामुळे एकच गर्दी झाली होती.  त्याचवेळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या गाड्यांचा ताफा तेथून निघाला होता. अपघात झालेला पाहून मंत्री शंभूराज देसाई यांनी गाड्यांचा ताफा थांबविला. गाडीतून खाली उतरले 
अन्‌ त्यांनी प्रथम जखमींची चौकशी केली. अपघातातील महिला अतिशय घाबरलेली होती, तिच्या समवेत एक लहान मुलही होते. 

मंत्री देसाई यांनी प्रथम जखमी महिलेची आस्थेवाईकपणे चौकशी केली. लहान मुलाला उचलून घेतले. तेथील पोलिस अधिकाऱ्यांना या जखमींना तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेण्याच्या सुचना केल्या. मंत्री देसाई यांनी जखमींसाठी पाणी आणण्याच्या सूचना केल्या. त्यांच्या ताफ्यातील एका पोलिस कर्मचाऱ्यांनी तातडीने पाण्याची बाटली आणून दिली. 

अपघात झालेल्या ठिकाणी बघ्याची गर्दी तर होतीच पण एसटी चालकाचीच चुकी असल्याचे तेथे उपस्थित असलेल्या नागरीकांनी सांगितले. हे एकुण अपघातग्रस्त एसटीच्या चालकास शंभूराज देसाई यांनी चांगलेच  सुनावले. मंत्री देसाई यांनी वेळीच दाखविलेली माणुसकी उपस्थित अनेकांना भावली. मंत्रीपणाचा डामडौल बाजूला ठेऊन मंत्री देसाई यांनी गाडीतून खाली उतरून अपघातग्रस्तांना केलेली मदत खऱ्या अर्थाने लोकनेत्यांचा वारसा ते चालवत असल्याचे पहायला मिळाले. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख