कोरोना रूग्णांसाठी शंभूराज देसाई चालवतात ७५ ऑक्सिजन,१० व्हेंटिलेटर बेडचे कोविड सेंटर   - Shambhuraj Desai runs Covid Center of 75 Oxygen, 10 Ventilator Beds for Corona Patients | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक
कोल्हापूर : खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनास सुरवात

कोरोना रूग्णांसाठी शंभूराज देसाई चालवतात ७५ ऑक्सिजन,१० व्हेंटिलेटर बेडचे कोविड सेंटर  

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 11 जून 2021

कोरोना रुग्णांची ऑनलाईन नोंदणी करुन आवश्यक त्या सर्व सोईसुविधा येथे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी शासकीय मदतीची अपेक्षा न करता कै. शिवाजीराव देसाई चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिल्या आहेत.

सातारा : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आल्याने पाटण मतदारसंघातील कोरोना रुग्णांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेडची कमतरता पडू नये यासाठी स्वत: पुढाकार घेत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई Shambhuraj Desai यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. दौलतनगर (ता.पाटण) येथे वर्षभरापासून कै.शिवाजीराव देसाई चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून खर्च करीत अद्यावत 75 ऑक्सिजन व 10 व्हेंटिलेटर बेडचे कोविड केअर सेंटर Corona Care Center चालविले आहे. कोणताही दिखावा न करता जनतेला कोरोना महामारीपासून वाचविण्याचा कसोशीने प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे पाटण मतदारसंघातील कोरोना रुग्णांसाठी  त्यांचे देवदूतासारखे कार्य सुरू आहे. Shambhuraj Desai runs Covid Center of 75 Oxygen, 10 Ventilator Beds for Corona Patients

कै. शिवाजीराव देसाई चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून दौलतनगर येथे शंभूराज देसाईंनी सुरु केलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये अद्यावत 75 ऑक्सिजन व 10 व्हेंटिलेटर बेड बसविले असून रुग्णांना ने आण करण्याकरीता स्वतंत्र्य ॲम्बूलन्स उपलब्ध आहे. सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांना गिझर, 100 लिटर शुद्ध पाणी, नवीन टॉयलेट तसेच येथे वैद्यकीय सेवा देणाऱ्या वैद्यकीय पथकाकरीता स्वतंत्र्यपणे राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ट्रस्टच्या वतीने रुग्णांना आवश्यक नाष्ता, काढा, दोन उखडलेली अंडी तसेच दोनवेळचे चांगल्या दर्जाचे जेवण देण्यात येत आहे. 

हेही वाचा : खुषखबर ; दुकाने रात्री ८ पर्यंत तर हॅाटेल १० पर्यंत सुरु राहणार

कोरोना रुग्णांच्या उपचाराकरीता एक नोडल अधिकारी, ऑक्सिजन बेडवरील रुग्ण पाहण्याकरीता प्राथमिक आरोग्य केंद्राचे दोन वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी तसेच व्हेंटिलेटर बेडवरील रुग्ण पाहण्याकरीता स्वतंत्रपणे खाजगी अनुभवी वैद्यकीय अधिकारी, खाजगी सराव करणारे 16 डॉक्टर, आठ नर्स, तीन फार्मासिस्ट, चार वॉर्ड बॉय, डेटा ऑपरेटर एक अशाप्रकारे वैद्यकीय पथक याठिकाणी तैनात आहे. कोरोना रुग्णांची ऑनलाईन नोंदणी करुन आवश्यक त्या सर्व सोईसुविधा येथे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी शासकीय मदतीची अपेक्षा न करता कै. शिवाजीराव देसाई चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिल्या आहेत. आजपर्यंत हजारो कोरोना रुग्ण या सेंटरमधून उपचार घेऊन बरे झाले असून त्यांनी मंत्री शंभूराज देसाई यांचे आभार मानले आहेत.

आवश्य वाचा : वाढदिवसानिमित्त राज ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना पत्र; दिले महत्वाचे संकेत...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख