मदन भोसले, मकरंद पाटील यांच्यातील साटेलोटे संपविणार.....

किसन वीर कारखान्याच्या सभासदांच्या हितासाठी विद्यमान आमदारांनी कधीच लढा उभारला नाही. केवळ आपली आमदारकी टिकविण्यासाठी सभासदांचे प्रश्न उपस्थित न करता कारखान्याच्या नादी लागायचे नाही, हेच आजपर्यंत पहायला मिळाले.
 मदन भोसले, मकरंद पाटील यांच्यातील साटेलोटे संपविणार.....
settlement in Wai taluka will be closed; Congress agitation in front of the statue of Kisan Veera

सातारा : किसन वीर कारखान्याकडे थकित असलेली यावर्षीची ऊस बीले येत्या २९ तारखेपर्यंत सभासदांच्या खात्यावर कारखाना व्यवस्थापनाने जमा करावीत. अन्यथा, ३० ऑगस्टला काँग्रेस पक्षाच्यावतीने किसन वीर आबांच्या जयंतीदिनी त्यांच्या पुतळ्यासमोर कारखाना व्यवस्थापनाविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे यांनी दिली आहे. दरम्यान वाई तालुक्यातील लोकप्रतिनिधींचे आमदारकी व कारखान्यासाठी असलेले साटेलोटे आता बंद झाले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. settlement in Wai taluka will be closed; Congress agitation in front of the statue of Kisan Veera

शासकिय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत विराज शिंदे यांनी किसन वीर कारखान्याच्या सभासदांसाठी काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले, किसन वीर साखर कारखान्याकडे असलेली यावर्षीची प्रलंबित ऊसबिले येत्या २९ तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावीत. तसेच कामगारांची थकित देणीही तातडीने द्यावीत. अन्यथा ३० ऑगस्टला किसन वीर आबांच्या जयंतीदिनी त्यांच्या कारखान्यावरील पुतळ्यासमोर काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात येणार आहे. 

हेही वाचा : नार्वेकर महाराष्ट्राचा जावई आहे का? किरीट सोमय्यांचा हल्लाबोल

किसन वीर कारखान्याच्या सभासदांच्या हितासाठी विद्यमान आमदारांनी कधीच लढा उभारला नाही. केवळ आपली आमदारकी टिकविण्यासाठी सभासदांचे प्रश्न उपस्थित न करता कारखान्याच्या नादी लागायचे नाही, हेच आजपर्यंत पहायला मिळाले. हे आता सभासद व शेतकरी खपवून घेणार नाहीत. त्यांची आमदारकी टिकविण्याचा ठेका शेतकरी व सभासदांनी घेतलेला नाही. आमदारकी व कारखान्यावरून वाई तालुक्यातील दोन लोकप्रतिनिधींत असलेले साटेलोटे बंद झाले पाहिजे. यापुढे काँग्रेसच्या मध्यमातून आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून लढा उभा केला जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

टोलनाक्याच्या प्रश्नाबाबत विचारले असता ते म्हणाले, वाई तालुका व सातारा तालुक्याच्या हद्दीवर असलेला टोलनाका बंद झाला पाहिजे. तसेच सातारा जिल्ह्यातील वाहनांसाठी टोलमाफी दिली गेली पाहिजे. त्यासाठी होणाऱ्या सर्वपक्षिय आंदोलनास आमचा पाठींबा राहिले, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in