'साटेलोटे' हा काँग्रेसकडून अपप्रचार; तर किसन वीरची निवडणूक लढवणार.....

कारखान्याची रिकव्हरी साडेआठ ते नऊ असते. जो उस किसन वीरला जातो, खंडाळ्याला जातो तोच उस जरंडेश्वरला गेला. तर त्याची रिकव्हरी साडेबारा येते. या रिकव्हरीतून निर्माण झालेला पैसा हा कुठे जातो याचाही विचार आपण सर्वांनी केला पाहिजे.
'साटेलोटे' हा काँग्रेसकडून अपप्रचार; तर किसन वीरची निवडणूक लढवणार.....

कवठे : माझे आणि किसन वीर कारखान्याच्या अध्यक्षांचे जर साटेलोटे असते. तर ते माझ्या विरोधात विधानसभेच्या निवडणुकीसाठी उभे राहिले असते का? याबाबत काही मंडळी जाणून बुजून अपप्रचार करीत आहेत, असे प्रतिउत्तर आमदार मकरंद पाटील यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे यांना दिले आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी कारखान्याबाबत अभ्यास करुन त्यातून समाधानकारक तोडगा काढल्यास कारखान्याची निवडणूक आपल्या सर्वांच्या सहकार्याच्या जोरावर शंभर टक्के लढवू, असेही त्यांनी स्पष्ट केले.  'Satellite' is propaganda for Congress; So Kisan veer sugar factorys election will contest .....

कवठे (ता. वाई) येथील शेरी शिवार रस्ता, पांढर वस्तीत बंदिस्त गटर, राष्ट्रीय महामार्ग ते जोतीबा मंदिर रस्त्यासाठी आमदार निधीतून तीस लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ झाला. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार पाटील म्हणाले, किसन वीर कारखान्याचे अनेक दिग्गजांनी नेतृत्व करुन, कारखान्याचा विस्तार वाढवला. आबांच्या कार्यकर्तृत्वामुळे धोम धरणाची निर्मिती होऊन कार्यक्षेत्रातील पाच तालुक्यातील उसाचे क्षेत्रात वाढ झाली. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना अर्थिकदृष्टया उभे करण्याचे महत्वपूर्ण काम किसन वीर आबांच्या प्रयत्नांतून झाले. 

परंतु, दुर्दैवाने ज्यांच्या ताब्यात या कारखान्याची सत्ता आली. त्यांनी या सत्तेचा गेल्या सोळा सतरा वर्षात फक्त दुरुपयोगच केला. सुरुवातीच्या काळात त्यांनी मी काहीतरी वेगळे करुन दाखवतो असे एक अभासी चित्र कारखाना सभासदांपुढे निर्माण केले गेले. राज्यातील पहिल्या पाच कारखान्यात किसन वीर कारखाना दिसेल. परंतू आज दुर्दैवाने शेवटच्या दहा कारखान्यात हा कारखाना दिसत आहे. शेतकऱ्यांनी आपला घाम गाळून, मेहनतीने उस पिकवला त्याच्या घामाचा दामही गेल्या दोन तीन वर्षात मिळालेला नाही. 

जे पैसे दिले तेही पूर्ण दिले नाहीत. कारखान्याची रिकव्हरी साडेआठ ते नऊ असते. जो उस किसन वीरला जातो, खंडाळ्याला जातो तोच उस जरंडेश्वरला गेला. तर त्याची रिकव्हरी साडेबारा येते. या रिकव्हरीतून निर्माण झालेला पैसा हा कुठे जातो याचाही विचार आपण सर्वांनी केला पाहिजे. अतिशय चुकीच्या पध्दतीने हा कारखाना चालवून त्यात भ्रष्टाचार झाला आहे. तुम्ही सर्वजण म्हणताय आबा तुम्ही यात लक्ष घाला, पुढाकार घेूवन संस्था वाचवा, आपण सर्व मिळून लक्ष घालून, किसन वीर आबांनी मोठी केलेली ही संस्था काहीही झाले तरी वाचलीच पाहिजे. या भावनेसोबत मीही तुमच्यासोबत आहे. 

कारखान्याचे भागभांडवल जवळपास ९० कोटींचे आहे. तर कारखान्याचा तोटा जवळपास २०० कोटींचा आहे. म्हणजे, जवळपास ११० कोटींचे शॉर्ट मार्जिन असताना, कोणतीही बँक या कारखान्याला कर्ज देवू शकणार नाही ही वस्तुस्थिती आहे. आज जवळपास एक हजार कोटींचे कर्ज कारखान्यावर आहे. यात बँका, कामगार, व्यापारी यांची देणी आहेत. कामगारांना सतरा ते अठरा महिने पगार मिळू शकत नाहीत, हे दुर्दैव आहे. सभासदांना चांगल्या प्रतिचा उस व रिकव्हरी जास्त असूनही कमी दर दिला जातो. एफआरपी प्रमाणे दिलेले पैसे वेळेवर मिळत नाहीत. परंतू याचा जाब विचारायला कोणीही कारखान्यावर जात नाही. याचा आपण सर्वांनी गांभिर्याने विचार करायला पाहिजे.
 
कारखान्याच्या या परिस्थितीबाबत मी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी दोन वेळा चर्चा केली आहे.  पुन्हा पुढील आठवड्यात बैठक होणार आहे. पाच तालुक्यातील शेतकऱ्यांचे अर्थिक जीवनमान अवलंबून असलेली ही संस्था काही करुन वाचवा, अशी त्यांना विनंती केली आहे. त्यांनीही याबाबत अभ्यास करुन त्यातून समाधानकारक तोडगा काढल्यास कारखान्याची निवडणूक आपल्या सर्वांच्या सहकार्याच्या जोरावर शंभर टक्के लढवू. 

सर्व काही करता येईल, परंतू पैशाचे सोंग करता येत नाही ही वस्तुस्थिती आहे. याचाही आपण सर्वांनी गांभिर्याने विचार करायला पाहीजे. कारण एकटा मकरंद पाटील हे सर्व करू शकत नाही. त्यासाठी सर्व सभासदांचा यासाठी पाठींबा असणे महत्वाचे आहे. किसनवीर आबांच्या जयंती दिवशीच कवठ्यात हे मी मुद्दाम सांगतोय कारण, या मातीतील सुपुत्रानेच जांबच्या उजाडे माळरानावर शेतकऱ्यांसाठी वैभव उभे केले. कवठे गावातील सर्व विकासकामांसाठी कायम प्रयत्नशील राहणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष महादेव मस्कर यांचे भाषण झाले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्या संगिता मस्कर, प्रकाश चव्हाण, पंचायत समितीच्या सभापती संगिता चव्हाण, उपसभापती विक्रांत डोंगरे, अनिल जगताप, मधुकर भोसले, महादेव मस्कर, सत्यजित वीर, शशिकांत पवार, दिलीप बाबर, रवींद्र जाधव, सरपंच श्रीकांत वीर, अंकुश कांगडे, बाळासाहेब पवार, दिलीप मोरे, कृष्णराव डेरे, मारूती पोळ, माधवराव डेरे, राहुल डेरे, राजेंद्र पोळ, संदिप डेरे, गोरख चव्हाण दत्तात्रय पोळ, शिवाजी करपे, नाना देवकर आदी उपस्थित होते. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in