सातारकरांचा स्वातंत्र्यदिन जिलेबीविना; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

स्वातंत्र्य दिनी जिलेबीच्या कारणास्तव नागरिक एकत्र येवून मोठ्या प्रमाणावर कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. परिणामी सार्वजनिक आरोग्य धोक्यात येऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन सार्वजनिक शांतता व सुरक्षिततेस बाधा उत्पन्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
In Satara District Jilebi Banned For Independent Day
In Satara District Jilebi Banned For Independent Day

सातारा : स्वातंत्र्य दिनी सातारा जिल्हा प्रशासनाने मिठाई पदार्थांचे उत्पादन, विक्री व वाटप करण्यास मनाई केली आहे. त्यामुळे स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमानंतर मिठाई व जिलेबीचे वाटप करता येणार नाही. परिणामी सातारकरांना यावर्षी स्वातंत्र्यदिन प्रथमच जिलेबी व मिठाईविनाच साजरा करावा लागणार आहे.    

यासंदर्भात साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज परिपत्रक जारी केले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन सर्वत्र मिठाईचे, खासकरुन जिलेबीचे वाटप केले जाते. या कार्यक्रमाच्या दिवशी जिलेबीच्या कारणास्तव नागरिक एकत्र येवून मोठ्या प्रमाणावर कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. 

परिणामी सार्वजनिक आरोग्य धोक्यात येऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन सार्वजनिक शांतता व सुरक्षिततेस बाधा उत्पन्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
त्यामुळे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्ह्यात  स्वातंत्र्य दिनी (१५ ऑगस्टला) संपूर्ण दिवसभर कोणत्याही सार्वजनिक तसेच घरगुती ठिकाणी जिलेबी, मिठाई पदार्थांचे उत्पादन तसेच विक्री व वाटप करण्यास मनाई करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com