सातारा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला हे न पटणारे; भाजप पालिका स्वबळावर लढणार 

जिल्ह्यातील आठपैकी पाच पालिका भाजपच्या ताब्यात येतील, तर जिल्हा परिषदेच्या ६४ जागांपैकी ४० पेक्षाही जास्त जागांवर भाजप विजयी होईल, असे वातावरण आहे. त्यामुळे भाजप हा पक्षाच्या चिन्हावरच निवडणुकांना सामोरे जाईल.’’
सातारा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला हे न पटणारे; भाजप पालिका स्वबळावर लढणार 
Satara is not a stronghold of the NCP; BJP will fight on its own

कऱ्हाड : जिल्ह्यातील नगरपालिकांसह जिल्हा परिषदेच्या निवडणुका भाजप पक्षाच्या चिन्हावर लढणार आहे. त्यासाठी भाजप नेहमीच तयार आहे, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना दिली. जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या बरोबरीनेच भाजपचीही ताकद आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. Satara is not a stronghold of the NCP; BJP will fight on its own
 
या वेळी भाजपचे शहराध्यक्ष एकनाथ बागडी उपस्थित होते. सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे, हेच मुळात न पटणारे आहे, असे सांगून श्री. पावसकर म्हणाले, ''मागील लोकसभा, विधानसभा निवडणुकांचा विचार केला तर ५५ टक्के मतदान भाजपला झाले आहे. ते मतदान राष्ट्रवादीच्या तोडीचेच आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजप पूर्ण ताकदीने लढणार आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्याचा आढावा घेतला आहे. त्या बैठकीत त्यांनी पक्षाचे आमदार, ज्येष्ठ नेते, पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला आहे. त्यावेळी पालिका, जिल्हा परिषेदच्या निवडणुका भाजपच्या चिन्हावर लढविण्याचा आग्रह पदाधिकाऱ्यांनी धरला. त्यासाठी पक्षीय पातळीवरही अनुकलता दिसते.'' ते म्हणाले, ''भाजपच्या चिन्हावर जिल्ह्यातील पालिकांच्या निवडणुकांसह जिल्हा परिषेदच्या निवडणुकांनाही आम्ही सामोरे जाणार आहोत.

मागील निवडणुकांचा अभ्यास केल्यास आठ पालिकांपैकी दोन पालिकेवर भाजपने सत्ता आणली आहे. त्याशिवाय तीन पालिकांच्या नगराध्यक्षांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. जिल्हा परिषदेच्या ६४ जागांपेकी २४ जागा आम्ही लढविल्या होत्या. त्यात सात जागांवर आम्ही यशस्वी झालो. यावेळी आठही पालिकांसह जिल्हा परिषेदच्या ६४ जागा आम्ही पक्षाच्या चिन्हावर लढू. जिल्ह्यातील आठपैकी पाच पालिका भाजपच्या ताब्यात येतील, तर जिल्हा परिषदेच्या ६४ जागांपैकी ४० पेक्षाही जास्त जागांवर भाजप विजयी होईल, असे वातावरण आहे. त्यामुळे भाजप हा पक्षाच्या चिन्हावरच निवडणुकांना सामोरे जाईल.’’ 

जिल्हा बॅंकही लढवू... 
जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीबाबत श्री. पावसकर म्हणाले, ''खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे यांच्यासह त्यांचे पाच ते सहा संचालक भाजपला मानणारे आहेत. प्रदेशाध्यक्षांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबत चर्चा केली आहे. या निवडणूका कधीही पक्षाच्या चिन्हावर होत नाहीत. मात्र, पक्षाने ठरविल्यास त्याही निवडणूका पूर्ण ताकदीने लढविण्याची भाजपची तयारी आहे. प्रदेशाध्यक्षांकडून त्याबाबतचा कोणताही निर्णय अद्याप आलेला नाही.’’ 
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in