साताऱ्याला मिळणार ३८ रूग्णवाहिका; जिल्हा परिषदेला 5.45 कोटींचा निधी मंजूर  - Satara to get 38 ambulances; 5.45 crore sanctioned to Zilla Parishad | Politics Marathi News - Sarkarnama

साताऱ्याला मिळणार ३८ रूग्णवाहिका; जिल्हा परिषदेला 5.45 कोटींचा निधी मंजूर 

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 15 एप्रिल 2021

हा निधी मंजूर केल्याबद्दल पालकमंत्री पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे विशेष आभार मानले आहेत. सात डोंगरी व सर्वसाधारण 31 अशा एकूण 38 रुग्णवाहिका खरेदी करण्याच्या निधीस मंजुरी देण्यात आली आहे.

सातारा : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता रुग्णांना तत्काळ उपचार मिळावेत, यासाठी जिल्हा परिषदेला 38 रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी पाच कोटी 45 लाख 87 हजार 256 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील आरोग्यसेवा बळकटीकरणासाठी शासनाने हा अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.

जिल्हा परिषदेला 14 व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या व्याजाच्या रकमेतून 38 रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी पाच कोटी 45 लाख 87 हजार 256 रक्कम मंजूर करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्यसेवा अधिक बळकट करण्यासाठी हे अतिशय महत्त्वाचे पाऊल आहे. या 38 सुसज्ज अशा रुग्णवाहिकांच्या माध्यमातून कोरोना संसर्ग रुग्णांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यास मदत होणार आहे.

हा निधी मंजूर केल्याबद्दल पालकमंत्री पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे विशेष आभार मानले आहेत. सात डोंगरी व सर्वसाधारण 31 अशा एकूण 38 रुग्णवाहिका खरेदी करण्याच्या निधीस मंजुरी देण्यात आली आहे. जिल्ह्याला रुग्णवाहिका मिळाव्यात, यासाठी माझ्यासह वित्त व नियोजन राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनीही प्रयत्न केल्याचे पालकमंत्री पाटील यांनी या वेळी सांगितले. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख