साताऱ्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल; जिल्हा प्रशासनास सहकार्य करा... - Satara district will soon emerge from the Corona crisis says MLA Shivendraraje | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक
कोल्हापूर : खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनास सुरवात

साताऱ्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल; जिल्हा प्रशासनास सहकार्य करा...

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 4 जून 2021

सध्याची आकडेवारी पाहता कोरोनाच्या संकटातून बाहेर पाडण्यासाठी आता जास्त दिवस लागणार नाहीत. त्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह आणि जिल्हा प्रशासनाचे काम नियोजनबद्धरीत्या सुरु असून कोरोनाचे संकट अंतिम टप्प्यात आहे.

सातारा : कोरोनाचा हॉटस्पॉट (Corona Hotspot) बनलेल्या सातारा जिल्ह्यात आता रुग्णसंख्या कमी होत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात आपला सातारा या संकटातून निश्चित बाहेर पडणार आहे. जिल्हाधिकारी आणि त्यांच्या प्रशासनाकडून चांगले काम सुरु आहे. त्यामुळे सोशल मीडियावर येणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवता सर्वांनी जिल्हा प्रशासनाला (District Administrator) सहकार्य करावे आणि आपला जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (MLA Shivendraraje Bhosale) यांनी केले आहे. Satara district will soon emerge from the Corona crisis says MLA Shivendraraje

यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले की, गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने चिंतेचे वातावरण झालेलं होते. मात्र गेल्या तीन- चार दिवसांपासून रुग्णसंख्या घटत आहे. कडक लॉकडाऊन सुरु असल्याने प्रत्येकजण अडचणीत आहे. सर्व प्रकारचे छोटे, मोठे व्यावसायिक यांच्यासह सर्वसामान्य माणूस देखील अडचणीत सापडला आहे. आता रुग्णसंख्या कमी होत असल्याने प्रत्येकाने थोडा धीर धरणे आवश्यक आहे. आपला सातारा कोरोनाच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी नेहमीसारखे सर्वांनीच प्रशासनाला सहकार्य करावे. 

हेही वाचा : उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीआधी मोदींचा विश्वासू चेहरा उतरणार मैदानात

सध्याची आकडेवारी पाहता कोरोनाच्या संकटातून बाहेर पाडण्यासाठी आता जास्त दिवस लागणार नाहीत. त्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह आणि जिल्हा प्रशासनाचे काम नियोजनबद्धरीत्या सुरु असून कोरोनाचे संकट अंतिम टप्प्यात आहे. सोशल मीडियावर काही चुकीच्या पध्दतने अफवा पसरवल्या जात आहेत. यावर कोणीही विश्वास न ठेवता आपला जिल्हा कोरोनमुक्त करण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

आवश्य वाचा : संजय राऊतांच्या दौऱ्यात आढळराव अन् मोहिते पाटलांची दिलजमाई?

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख