राष्ट्रवादीच्या गुळाला शिवेंद्रसिंहराजे भूलणार का.....

सातारच्या दोन्ही राजेंनी तटस्थ भूमिका घेत भाजपसोबत राहून स्वतंत्र पॅनेल टाकण्यासाठी मदत केली तर भाजप आपल्या विचाराचे किमान निम्मे संचालक जिल्हा बॅंकेत निवडून आणू शकते. त्यासाठी दोन्ही राजेंचे मन वळविण्याचे काम भाजपला करावे लागेल.
राष्ट्रवादीच्या गुळाला शिवेंद्रसिंहराजे भूलणार का.....
Satara District Bank Election; The future of the BJP panel on the role of Udayanraje, Shivendraraje ....

सातारा : जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसला विरोध करून भारतीय जनता पक्षाला आपली ताकद दाखविण्याची संधी आलेली आहे. यामध्ये साताऱ्यातील दोन राजेंची भूमिका महत्त्‍वपूर्ण ठरणार आहे. राष्ट्रवादीने शिवेंद्रसिंहराजेंना गुळ लावून आपल्यासोबत ठेवण्याची तयारी ठेवली आहे. तर त्यांच्याशिवाय भाजप रणनीती ठरवू शकत नाही. येत्या दोन दिवसांत भाजपचे नेते एकत्र बसून जिल्हा बँकेबाबतची भूमिका ठरविणार आहेत. त्यामध्ये त्यांना सातारच्या दोन्ही राजांचे मन वळविण्यात यश आले तर राष्ट्रवादीला ही निवडणूक अडचणीची ठरणार आहे. Satara District Bank Election; The future of the BJP panel on the role of Udayanraje, Shivendraraje ....

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीस अखेर मुहूर्त लागला आहे. सध्या कच्ची मतदार यादी प्रसिध्दीची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष कोणाकोणाची पॅनेल उभी राहणार, याकडे लागले आहे. जिल्हा बॅंकेवर राष्ट्रवादीचे वर्चस्व असले तरी बॅंकेच्या विविध मतदारसंघांतील सर्वाधिक मते भाजपचे आमदार व विद्यमान अध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे आहेत. त्यांना सोबत घेऊन ही निवडणूक सोपी करण्याचा डाव राष्ट्रवादीच्या नेत्यांचा आहे. 

पण, भाजपच्या जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांची भूमिका ही राष्ट्रवादीविरोधी आहे. त्यामुळे यावेळेस जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत भाजपला आपली ताकद दाखविण्याची संधी आलेली आहे. या संधीचे सोने करताना सर्व नेत्यांची वज्रमूठ बांधण्याचे आव्हान भाजपपुढे आहे. त्यामुळे सर्वांच्या एकीतून भाजपचे नेते राष्ट्रवादीसमोर आव्हान उभे करू शकतात. पण, अद्याप तरी आमदार भोसले, आमदार गोरे, खासदार भोसले व अतुल भोसले या चार जणांनी आपापल्या नावांचे ठराव करून पहिले पाऊल टाकले आहे.

त्यांना आता उर्वरित मतदारसंघांसाठीची जमावाजमव करावी लागणार आहे. आमदार भोसले यांच्या विचारांचे पाच संचालक आहेत. त्यामुळे त्यांची ताकद ओळखून राष्ट्रवादीने त्यांना सोबत घेऊन ही निवडणूक सर्वसमावेशक पध्दतीने बिनविरोध करण्याच्या तयारीत राष्ट्रवादीचे नेते आहेत. पण, भाजपनेही आपली ताकद दाखविण्याचा निर्णय घेतल्यास राष्ट्रवादीला ही निवडणूक सोपी राहणार नाही. पण, त्यांची सर्व गणिते खासदार भोसले व आमदार भोसले यांच्यावर अवलंबून आहेत. सातारच्या दोन्ही राजेंनी तटस्थ भूमिका घेत भाजपसोबत राहून स्वतंत्र पॅनेल टाकण्यासाठी मदत केली तर भाजप आपल्या विचाराचे किमान निम्मे संचालक जिल्हा बॅंकेत निवडून आणू शकते. त्यासाठी दोन्ही राजेंचे मन वळविण्याचे काम भाजपला करावे लागेल. 

दिग्गज नेते लक्ष घालणार... 
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. यामध्ये त्यांना यश आले तर भाजपचे पॅनेल जिल्हा बॅंकेत उभे राहू शकते. त्यासाठी येत्या दोन दिवसांत भाजपचे नेते एकत्र बसून रणनीती ठरविणार आहेत. त्यामध्ये दोन्ही राजांचे मन वळविण्यात यश आले तर राष्ट्रवादीला ही निवडणूक अडचणीची ठरणार आहे. 

 
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in