गोवा मुक्ती संग्रामातील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक रावसाहेब घार्गे यांचे निधन - Raosaheb Gharge, a veteran freedom fighter of Goa liberation struggle, passed away | Politics Marathi News - Sarkarnama

गोवा मुक्ती संग्रामातील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक रावसाहेब घार्गे यांचे निधन

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 7 जानेवारी 2021

तिरिक्त पोलिस अधीक्षक या पदावरून ते सेवानिवृत्त झाले होते.  सेवानिवृनीनंतर ते २७ बर्ष हुतात्मा मंडळाचे अध्यक्ष होते. १९६६ मध्ये त्यांनी पुढाकार घेऊन आपल्या सहकार्यांसमवेत हुतात्मा मंडळाची स्थापना करुन जयराम स्वामींचे वडगांवचा शैक्षणिक क्षेत्रात नावलौकिक वाढविण्याचे काम केले.

कराड : गोवा मुक्ती संग्रामातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित झालेले सेवानिवृत्त अतिरिक्त पोलिस अधीक्षक रावसाहेब अनंत घार्गे (वय ८७) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज (गुरूवारी) सकाळी कराडच्या वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. 

खटाव तालुक्यातील जयराम स्वामींचे वडगांव हे मुळगाव असलेले रावसाहेब घार्गे हे सर्वत्र "काका" म्हणून परिचित होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. कुटुंबवत्सल, शिस्तप्रिय पोलिस अधिकारी असे बहुआयामी व्यक्तिमत्व होते.त्यांचा जन्म २५ जुलै १९३४ मध्ये शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी पोलिस दलात अधिकारी पदावर १९५९ ते १९९२ अशी ३३ वर्षे सेवा बजावली.

अतिरिक्त पोलिस अधीक्षक या पदावरून ते सेवानिवृत्त झाले होते.  सेवानिवृनीनंतर ते २७ बर्ष हुतात्मा मंडळाचे अध्यक्ष होते. १९६६ मध्ये त्यांनी पुढाकार घेऊन आपल्या सहकार्यांसमवेत हुतात्मा मंडळाची स्थापना करुन जयराम स्वामींचे वडगांवचा शैक्षणिक क्षेत्रात नावलौकिक वाढविण्याचे काम केले.

जयराम स्वामी विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेजचे ते प्रमुख मार्गदर्शक राहिले. ते ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक असून सामाजिक क्षेत्रात शेवटच्या क्षणापर्यंत ते सक्रिय राहिले. त्यांच्या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना २०१५ मध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते विशेष सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले होते.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख