शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा : उरमोडीच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडले

उरमोडी धरणाच्या उजव्या कालव्यामुळे अंबवडे, भोंदवडे, गजवडी, सोनवडी, आरे, पोगरवाडी, झरेवाडी, करंडी, उपळी, आष्टे, शेळकेवाडी आदी गावांतील सुमारे चार हजार हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. पाणी शिवारात पोचल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त करून शिवेंद्रसिंहराजे यांचे आभार मानले.
शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा : उरमोडीच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडले
Pursuit of Shivendraraje: Water was released from the right canal of Urmodi

सातारा : सातारा तालुका सुजलाम सुफलाम व्हावा, तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या पिकाला हक्काचे पाणी मिळावे म्हणून (कै.) भाऊसाहेब महाराजांनी उरमोडी धरण (Urmodi Dam)  बांधून जलक्रांती घडवली. आज उरमोडी धरणाचे पाणी सातारा तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या शिवारात पोचले असून, (कै.) भाऊसाहेब महाराजांचे (Bhausaheb Maharaj) स्वप्न साकार झाले आहे. लवकरच काशीळपर्यंत उरमोडीचे पाणी पोचेल आणि संपूर्ण तालुक्‍याचा पाणीप्रश्न सुटेल, असा विश्‍वास आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendraraje Bhosale) यांनी व्यक्त केला. (Pursuit of Shivendraraje: Water was released from the right canal of Urmodi)

शिवेंद्रसिंहराजे यांच्या पाठपुराव्यातून मार्गी लागलेल्या उरमोडी उजवा कालव्यातून धरणाचे पाणी सोडण्यात आले. करंडी, उपळी या गावांमधून जाणाऱ्या या कालव्यात शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. या वेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले, सातारा पालिकेचे नगरसेवक धनंजय जांभळे, करंडीचे सरपंच शशिकांत जाधव, पोगरवाडीच्या सरपंच सुलाबाई लोहार, उद्धव घोरपडे, उपळीच्या सरपंच मंगल पवार, संदीप पवार, आष्टेचे उपसरपंच सुनील भोसले, झरेवाडीच्या सरपंच ज्योती नगरे, सुमन पवार, अमोल काटकर उपस्थित होते.

 उरमोडी धरणाच्या उजव्या कालव्यामुळे अंबवडे, भोंदवडे, गजवडी, सोनवडी, आरे, पोगरवाडी, झरेवाडी, करंडी, उपळी, आष्टे, शेळकेवाडी आदी गावांतील सुमारे चार हजार हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. पाणी शिवारात पोचल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त करून शिवेंद्रसिंहराजे यांचे आभार मानले. दरम्यान, पुढे काशीळपर्यंत जाणाऱ्या या कालव्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करा आणि उजव्या कालव्याच्या माध्यमातून या भागातील शेतकऱ्यांचा पाणीप्रश्न संपुष्टात आणा, अशा सूचना शिवेंद्रसिंहराजे यांनी अधिकाऱ्यांना केल्या. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in